दिवाळी फराळ म्हणजे यात करंजी, चकली, लाडू, शंकरपाळी, शेव, अनारसे, नानकटाई, चिवडा हे प्रमुख पदार्थ आले. आता इतके पदार्थ बनवायचे म्हटले की ते एका दिवसात कसे शक्य होतील असं तुम्ही म्हणाल. बरेच जण एका दिवसाला एक किंवा फारफार सारखे जिन्नस लागणारे आणि फार काही मेहनत घ्यावी लागत नाही असे दोन पदार्थ बनवतात. पण एका दिवसातही फराळ तुम्हाला बनवता येऊ शकतो. आता ते कसं ते पाहुयात.
advertisement
Kitchen Jugaad: कुकरमध्ये पणत्या ठेवताच झाली कमाल; दिवाळीआधीच करा हा उपाय
दिवाळी फराळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. वेगवेगळ्या सामग्रीत ते बनवता येतात. पण काही अशा गोष्टी आहेत, ज्या हे पदार्थ बनवताना सगळीकडे सारख्या आहेत. याच गोष्टी तुम्हाला आधी करून ठेवायच्या आहेत. म्हणजे दिवाळी फराळ एका दिवसात करणं तुम्हाला शक्य होईल. याला दिवाळी फराळाची पूर्वतयारी म्हणतात.
म्हणजे दिवाळी फराळासाठी जे काही लागतं, ते आधीच तयार ठेवणं म्हणजे तुमचं फक्त फराळ बनवण्याचं काम उरतं. आता दिवाळी फराळाच्या पूर्वतयारीत नेमकं काय काय करायचं ते पाहुयात.
1) दिवाळी फराळासाठी कोणते साहित्य लागतं, त्यानुसार किराणा मालाची यादी करायची. घरात कोणते पदार्थ किती प्रमाणात आहेत ते तपासून ही यादी बनवावी.
2) सुकं खोबरं कपड्याने पुसून घेऊन थोडा वेळ उन्हात ठेवायचं. चिवड्यासाठी लागणारे खोबऱ्याचे पातळ उभे काप करून ठेवा. लाडू, करंजीच्या सारणासाठी लागणारं सुकं खोबरं किसून थोडं भाजून डब्यात भरून ठेवा.
3) डाळी पॅकिंगच्या घ्या. त्या स्वच्छ करण्यात वेळ जात नाही. 2-3 तास उन्हात ठेवून दळायला द्या.
4) करंजीचं सारण आणि लाडूसाठी लागणारा रवा चाळून स्वच्छ करून ठेवा. शंकरपाळ्यांसाठी लागणारा मैदा चाळून ठेवा. लाडूसाठी बेसनचं पीठ चाळून ठेवा. म्हणजे गाठी होणार नाहीत.
5) करंजीसाठी रव्याचं सारण असेल तर रवा तुपावर लालसर भाजून ठेवा. तसंच खसखस आणि तीळही लालसर भाजून ठेवा.
Desi Jugaad: स्लायडिंग विंडोमध्ये अडकलेली घाण कशी स्वच्छ करायची? कागदाचा एक तुकडा करेल मदत
6) चकलीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या डाळी, पोहे, साबुदाणा स्वच्छ करून ठेवा. पांढरे तीळ स्वच्छ करून ठेवा.
7) चिवड्यासाठी लागणारे पोहे किंवा चुरमुरे चाळून घ्या, त्यातील बारीक कचरा किंवा पिठी खाली पडते.
7) चिवड्यासाठी लागणारे चण्याची डाळ, शेंगदाणे स्वच्छ करून त्यांनाही ऊन दाखवा. कडीपत्ता धुवून सुकवून ठेवा.
8) लाडूसाठी लागणारे किंवा सारणासाठी लागणारे ड्रायफ्रुट्सचे काप करून किंवा किसून बरणीत भरून ठेवा.
9) रव्याच्या लाडूसाठी, सारणासाठी लागणारी पिठी साखर करून ठेवा.
10) भाजणीच्या चकलीसाठी भाजणी तयार ठेवा.
11) वेलची गॅसवर भाजून घ्या आणि मिक्सरमध्य बारीक करा. यात थोडी साखर टाका म्हणजे ती नीट बारीक होईल.
12) अनारशांसाठी लागणारे तांदूळ भिजत घालून ठेवा. गूळ किसून ठेवा.
13) चकली, शेवसाठी लागणार सोयरा तपासा, स्वच्छ धुवून वाळवून ठेवा.
14) दिवाळीची साफसफाई करताना फराळ ठेवण्यासाठी लागणारे डबे रिकामी करून ठेवा.
Ladies Special युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. चला तर मग आता लगेच झटपट दिवाळी फराळ बनवायला घ्या.