Kitchen Jugaad: कुकरमध्ये पणत्या ठेवताच झाली कमाल; दिवाळीआधीच करा हा उपाय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kitchen Jugaad Video: कुकरमध्ये दिवा. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण दिवा कुकरमध्ये ठेवताच असं काही झालं की तुम्ही विचारही केला नसेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा हा उपाय कराल.
नवी दिल्ली : दिवाळी तोंडावर आली आहे. अनेकांची दिवाळी शॉपिंगही सुरू झाली आहे. रांगोळ्या, पणत्या खरेदीचीही लगबग सुरू होईल. दर दिवाळीत आपण नवीन पणत्या घेतो. मग जुन्या पणत्यांचं काय करायचं असा प्रश्न पडतो. याच जुन्या पणत्यांच्या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
कुकरमध्ये दिवा. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एका महिलेने हा जुगाड करून दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दिवा कुकरमध्ये ठेवताच असं काही झालं की तुम्ही विचारही केला नसेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा हा उपाय कराल.
advertisement
महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार तुम्हाला कुकरमध्ये पाणी गरम करायचं आहे. त्यात जुन्या पणत्या टाकायच्या आहेत. कुकरचं झाकण बंद करून थोडं गरम करून घ्यायचं. गॅस बंद करून कुकर थंड झाला की त्यातील पणत्या काढून त्या पाण्याने धुवून घ्या. यामुळे जुने चिकट झालेले दिवे, तुम्हाला पुन्हा वापरता येतील.
दुसरं म्हणजे हे दिवे तुम्हाला पुन्हा वापरायचे नसतील पण फेकायचेही नसतील तर तुम्ही याचा आणखी एका पद्धतीनं वापर करू शकता. ते म्हणजे कुकरच्या उलटा करून खालच्या बाजूवर हा दिवा ठेवायचा आणि थोडं पाणी टाकून कुकरवर घासायचा. कुकरचा खालचा भाग काळपट झालेला असतो. जो साबण आणि घासणीने सहजासहजी निघत नाही. पण पणतीने घासताच हा काळपटपणा सहज निघेल. साबण लावण्याचीही गरज नाही. अशाच पद्धतीने तुम्ही लोखंडी तवा, लोखंडी कढईही घासू शकता.
advertisement
अशा पद्धतीने जुन्या दिव्यांचा तुम्ही पुन्हा वापर करू शकता. Puneri Tadka युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा उपाय तुम्ही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
Location :
Delhi
First Published :
October 22, 2024 8:51 AM IST