TRENDING:

तुमच्या शरीरातील 'हा' अवयव; डॉक्टरही ऑपरेशनमध्ये फेकून देतात, दरवर्षी लाखो सर्जरी

Last Updated:

Human body part facts : मानवी शरीरातील एक असा अवयव जो लोक काढून टाकत आहेत. दरवर्षी लाखो सर्जरी होत आहेत. लाखो लोक शरीरातून हा अवयव काढून टाकत आहेत आणि डॉक्टरही फेकून देत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : मानवी शरीरात बरेच अवयव आहेत. त्यांची वेगवेगळी कार्ये आहेत. प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. एखाद्या अवयवाने काम करणं बंद केलं की जीवाला धोका निर्माण होतो. असं असताना मानवी शरीरातील एक असा अवयव जो लोक काढून टाकत आहेत. दरवर्षी लाखो सर्जरी होत आहेत. लाखो लोक शरीरातून हा अवयव काढून टाकत आहेत आणि डॉक्टरही फेकून देत आहेत. आता हा अवयव कोणता? आणि लोक तो का काढून टाकत आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

मानवी शरीर ही एक चमत्कारिक निर्मिती आहे. काही असे अवयव जे आधी कामाचे होते पण आता नाहीत. त्यापैकी काही अवयव नष्ट झाले पण काही मानवी शरीरात अजूनही तसेच आहेत. अशा निरुपयोगी अवयवापैकी एक म्हणजे अपेंडिक्स. आतड्याच्या शेवटी लटकणारा एक लहान, पिशवीसारखा भाग जो कोणत्याही विशिष्ट उद्देशाने काम करत नाही.

General Knowledge : मानवी शरीरातील असा अवयव जो रात्री मोठा होतो

advertisement

अपेंडिक्सला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतात, म्हणजेच उत्क्रांतीचा अवशेष. हा मानवी शरीराच्या त्या भागांपैकी एक आहे जो आपल्या पूर्वजांसाठी उपयुक्त होता. अपेंडिक्स एकेकाळी वनस्पती आधारित अन्न पचन करण्यास मदत करत असे. प्राचीन काळात जेव्हा मानव गवत आणि पानांवर जगत होता, तेव्हा अपेंडिक्स पचनास मदत करणारे बॅक्टेरिया साठवण्याचं काम करत असे. पण आधुनिक मानवांच्या मांस-आधारित जीवनशैलीत त्याचा काही उपयोग नाही, ते निरुपयोगी झालं आहे. ब्रिटानिकाने ते सात प्रमुख वेस्टिजियल वैशिष्ट्यांपैकी एक म्हणून सूचीबद्ध केलं आहे. ते सूजू शकतं आणि प्राणघातक ठरू शकतं.

advertisement

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2021 नुसार, दरवर्षी जगभरात 1.7 कोटी नवीन अ‍ॅपेंडिसाइटिसचे रुग्ण नोंदवले जातात आणि लाखो लोक अ‍ॅपेंडिसाइटिस शस्त्रक्रिया करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार विकसनशील देशांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते, जिथे 8% लोकसंख्येला त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी याचा त्रास होतो. अमेरिकेत दरवर्षी 3 लाख शस्त्रक्रिया केल्या जातात, तर भारतासारख्या देशांमध्ये अंदाजे 5 लाख ते 7 लाख लोकांवर अ‍ॅपेंडेक्टॉमी ही शस्त्रक्रिया केली जाते. ही एक साधी शस्त्रक्रिया आहे. 2023 मध्ये लाईव्ह सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, यासाठी 30-45 मिनिटं लागतात आणि आठवडाभरात रुग्ण बरा होतो.

advertisement

माणसाच्या शरीराचा हा अवयव आयुष्यभर वाढतो, इतका लांब होतो की म्हातारपणात लटकू लागतो

पोटदुखी, उलट्या आणि ताप यासारखी अपेंडिसाइटिसची लक्षणं आढळल्यास तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. कारण गँग्रीन किंवा छिद्र पडू शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

डॉक्टर अनेकदा अ‍ॅपेंडिसाइटिसच्या प्रकरणांमध्ये कोणताही विचार न करता ते काढून टाकतात. हा अवयव काढून टाकल्याने केवळ संसर्गाचा धोका कमी होत नाही तर सामान्य जीवन देखील सुनिश्चित होतं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अपेंडिक्स काढून टाकल्याने अतिसार किंवा इतर पचन समस्या उद्भवत नाहीत, पण रोगप्रतिकारक शक्तीवर त्याचा थोडासा परिणाम होऊ शकतो. अलिकडच्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की ते काही चांगले बॅक्टेरिया साठवतं, पण हे वादग्रस्त आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
तुमच्या शरीरातील 'हा' अवयव; डॉक्टरही ऑपरेशनमध्ये फेकून देतात, दरवर्षी लाखो सर्जरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल