मलेशियातील ही घटना आहे. ही महिला तिच्या पतीसोबत खूप आनंदी होती. त्यांचं वैवाहिक जीवन चांगलं चाललं होतं. तिचा पती तिला त्याचा मोबाईल फोनला हात लावू देत नव्हता, पण त्यामुळे पत्नीला तसा काही फरक पडला नाही. दरम्यान तिच्या पतीचा मृत्यू झाला. पत्नीला आपलं जग उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागला. एकदा तिने पतीचा मोबाईल आपल्या हातात घेतला आणि तो ऑन केला. तेव्हा तिने जे पाहिलं ते पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पतीच्य निधनाचं तिचं सर्व दुःख रागात बदललं. नवऱ्याचा मृत्यू म्हणजे त्याला मिळालेल्या त्याचं कर्माचं फळ आहे असं ती म्हणते. असं त्या फोनमध्ये होतं काय?
advertisement
अजबच आहे राव! 75 वर्षांचे आजोबा, बायकोला सोडून फुग्याच्या प्रेमात, बंद खोलीत रोमान्सही करतात
पतीच्या मृत्यूनंतर जेव्हा पत्नीने त्याचा फोन तपासला तेव्हा तिने दुसऱ्या महिलेसोबत त्याचे चॅट्स पाहिले. तिच्या पतीचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. ती महिला मेसेज डिलीट करायला विसरली, ज्यामुळे हे रहस्य उघड झालं.
पतीच्या बेवफाईची संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी तिने त्या महिलेशी संपर्कही साधला. ती तिच्या घरी गेली आणि तिला कळलं की दुसऱ्या महिलेच्या पतीलाही त्याची पत्नी त्याला फसवत असल्याचं माहिती नव्हतं. सुरुवातीला त्या महिलेने आपल्यावरील आरोप नाकारले, पण जेव्हा तिने तिच्या पतीचे फोन मेसेज आणि व्हॉइस मेसेज ऐकले तेव्हा ती गप्प बसली.
माझी बायको! नवऱ्यांनी पोस्ट केले पत्नींचे फोटो, पाहून पोलीसही शॉक, फेसबुक ग्रुपच बंद केला, पण का?
दुसऱ्या महिलेचा पतीही भडकला. आता ती महिला म्हणते की तिचा पती गेला हे चांगलं आहे. जर तो जिवंत असता तर हे सर्व कळल्यानंतर मी स्वतः त्याला मारलं असतं असं ती म्हणते.
आता या महिलेने नवऱ्याचा मोबाईल चेक केला म्हणून तिला त्याचं सीक्रेट समजलं. पण मोबाईल चेक न करता तुमच्या जोडीदाराचं कुठे अफेअर आहे का? हे कसं ओळखावं पाहुयात.
जोडीदार विवाहबाह्य संबंधात आहे हे कसं ओळखावं?
1- स्वतःकडे अधिक लक्ष देणं
जेव्हा पुरुष किंवा महिला प्रेमात असते किंवा एखाद्या नात्याची सुरुवात असते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःकडे खूप लक्ष देते. त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जर तुमचा नवरा किंवा बायको असं काही असेल तर त्यांच्या आयुष्यात कुणीतरी प्रवेश केल्याचं हे लक्षण असू शकतं.
2- तुमची तुलना करणं
जर तुमचा नवरा तुमची तुलना दुसऱ्या महिलेशी करत असेल किंवा या उलट बायको तसं करु पाहात असेल, तर समजून घ्या की त्याला किंवा तिला आता तुमच्यात उणिवा दिसू लागल्या आहेत. हे देखील एक लक्षण असू शकतं.
3- फोनला चिकटून राहणं
नवरा किंवा बायको बराच वेळ फोनवर असेल तर. तसेच आपला फोन एकटं सोडून कुठे जात नसेल, तर काहीतरी गडबड आहे हे समजून घ्या.
जोडीदाराला घटस्फोट, बहीण-भाऊ झाले नवरा-बायको, मूलही झालं, पण नंतर घडलं ते धक्कादायक
4- देहबोली बदलते
जर तुमचा जोडीदार विचित्र किंवा वेगळं वागत असेल तर ते कोणा तिसऱ्या व्यक्तीमुळे होऊ शकते. अशावेळी ऑफिसमध्ये जास्त काम असल्याचा आव लोक आणतात. ते बाहेर जास्त वेळ घालवू लागतात आणि तुमच्यासाठी त्यांना वेळच मिळत नसेल, तर काही गडबड आहे असं समजा.
5- जिव्हाळा नसणं
वैवाहिक नात्यात शारीरिक जवळीक सर्वात महत्त्वाची असते. जर तुमच्या नात्यात तसं होत नसेल, तर सावध राहा. जर तुमच्या जोडीदाराचा स्पर्श आवडत नसेल किंवा तुमच्याबद्दल त्याला काहीही वाटत नसेल, तर ते तुमच्यासाठी एक मोठं लक्षण ठरू शकतं.