लग्न होऊनही खुशबू आणि चंदन दोघेही त्यांचं बालपणीचं प्रेम विसरू शकले नाहीत. ते फोनवरून एकमेकांच्या संपर्कात राहिले आणि गुपचूप भेटत राहिले. खुशबूला दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. लोक सांगतात, की चंदन मंगळवारी रात्री खुशबूला भेटायला आला होता. पण, राजेशने ते पाहिलं. मग राजेशने गावकऱ्यांसमोर खुशबू आणि चंदनचं लग्न लावून दिलं. यानंतर खुशबूने तिचा दोन वर्षांचा मुलगा वडील राजेश कुमार यांच्यासोबत राहणार असल्याचंही लेखी दिलं. याला तिचा आक्षेप नाही. तसंच, आजपासून तिचा पहिला पती राजेश कुमार मालमत्तेवर तिचा कोणताही अधिकार राहणार नाही, असं लिखित घेण्यात आलं.
advertisement
लग्नच होईना! वैतागलेल्या तरुणाचं थेट भोलेनाथाला अजब पत्र, पत्ता वाचून पोस्टमन चक्रावला
राजेश कुमार यांनी सांगितलं की, दोघांमध्ये वारंवार बोलणे होत होतं. लग्नानंतर त्याची पत्नी खुशबू सासरच्या घरी आली असता तिला याबद्दल विचारण्यात आलं. मात्र आपण आई-वडिलांशी बोलत असल्याचं तिने सांगितलं. मात्र चौकशीत ती तिच्याच गावातील चंदन या तरुणाशी बोलत असल्याचं निष्पन्न झालं. दोघांमधील संभाषण बरेचदा गुप्तपणे चालू होतं. यावेळी रागाच्या भरात पतीने खुशबूचा मोबाईल चार-पाच वेळा फोडला. पण शेवटी दोघांचं लग्न लावून देणंच त्याला चांगलं वाटलं.
खुशबूने चौकशीदरम्यान सांगितलं की, तिचं लहानपणापासूनच चंदनवर प्रेम होतं. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचं प्रेम कधीच स्वीकारलं नाही. यानंतर तिचं राजेशशी लग्न झालं. तिला राजेश आवडत नव्हता. लग्नानंतरही ती प्रियकराशी बोलत राहिली. ते तीन वर्षे फोनवर बोलत आणि भेटत राहिले. आपल्या पतीचे आभार मानताना खुशबू म्हणाली की, राजेशमुळे आज आम्ही एकत्र आहोत. तिला तिच्या दोन वर्षांच्या मुलालाही सोबत ठेवायचं आहे. पण तिचा नवरा या मुलाला तिच्याकडे सोपवू इच्छित नाही.
