एका कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. महिलेने शेअर केलेला हा व्हिडीओ, जिने आपल्या पतीला मुलगा हवा असल्याचं सांगितलं. व्हिडीओत महिला सुरुवातीला एकटी दिसते. तिच्या हातात एक ड्रेस आहे जी तो खाली फेकते आणि त्याठिकाणी एक मुलगी येते. मग मुलगी आईसारखंच हातात ड्रेस घेऊन खाली फेकत पुन्हा दुसरी मुलगी दिसते. असं एकएक करत मुली ड्रेस फेकतात आणि महिलेनंतर एका रांगेत 5 मुली दिसतात.
advertisement
बायको असताना गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, उद्ध्वस्त झाला, प्रायव्हेट पार्ट गमावला
व्हिडीओच्या शेवटी एक पुरुष तिथं येतो. जो पाचव्या मुलीच्या हातात ड्रेस देतो आणि मग ती मुलगी ड्रेस फेकते. तर जमिनीवर बसलेलं एक बाळ दिसतं. त्याला पाहून महिलेसह सगळ्या मुली किंचाळतात. हा बाळ मुलगा आहे, असं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. ज्याला पाहून त्यांना आनंद होतो आणि आनंदाने, उत्साहाने त्या ओरडताना दिसतात.
@whataboutaub या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहे. सुंदर कुटुंब, वडिलांना मुलगा हवा पण त्यांचं प्रेम मुलींवर जास्त असतं, हे सुंदर आहे, अशा कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.