निजामाच्या या सवयीचा त्यांच्या एका नोकराला फार फायदा झाला. अल्बर्ट आबिद नावाची एक अर्मेनियन व्यक्ती मेहबूब खान यांचा विश्वासू सेवक आणि जणू उजवा हातच होता. प्रसिद्ध हैदराबादी इतिहासकार डी. एफ. कारका यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मेहबूब अली खान आपले कपडे बदलत असायचे तेव्हा आबिद तिथे हजर असायचा. निजामाला मदत करणं, हे त्याचं काम होतं. तो निजामाचे कपडे, बूट, घड्याळं, दागिने आणि इतर वस्तूंची काळजी घेत असे. निजाम एकदा वापरलेले मोजे पुन्हा वापरत नसे. आबिदने याचा फायदा घेतला. तो ते मोजे स्वत: घेऊन जायचा किंवा काही दिवसांनी पुन्हा निजामालाच ते मोजे विकायचा.
advertisement
General Knowledge : पाकिस्तानातील लोक भारताला काय म्हणतात?
अल्बर्ट आबिदने निजामाची फसवणूक करून भरपूर पैसे कमवले होते. या पैशांतून त्याने हैदराबादमध्ये एक मोठं डिपार्टमेंटल स्टोअर उघडलं. हे डिपार्टमेंटल स्टोअर 'आबिद' या नावाने ओळखलं जात होतं. आता हे डिपार्टमेंटल स्टोअर अस्तित्वात नाही; पण ते ज्या ठिकाणी होतं ती जागा आता देखील 'आबिद स्क्वेअर' नावाने ओळखली जाते.
पाहुण्यांकडून घेत असे कमीशन
तसंच, जेव्हा एखादा व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी निजामाला भेटण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा आबिद त्याच्याकडून बक्कळ कमिशन घेत असे. निजामाला वस्तू सादर केल्या जाण्यापूर्वी आबिद त्या स्वीकारल्या जातील किंवा नाकारल्या जातील, याबाबत माहिती देत असे. आबिदच्या मते ज्या वस्तू स्वीकारल्या जातील, त्या किंमत न बघता खरेदी केल्या जायच्या कारण त्या निजामाला आवडायच्या.
General Knowledge : कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत राजा? संपत्ती ऐकून डोळे चक्रावतील
हॅरिएट रॉन्केन लिंटन (Harriet Ronken Lynton) आणि मोहिनी राजन यांनी लिहिलेल्या 'डेज ऑफ द बिलव्ह्ड' या पुस्तकातील माहितीनुसार, निजामाच्या सेवकाला त्याची विलासी सवय लक्षात आली. म्हणून त्याने टाकून दिलेले मोजे जमा करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्याच्याकडे पुरेसे मोजे जमा झाले तेव्हा त्याने ते विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा आकार लहान असल्याने ते बाजारात विकले जात नव्हते. यातून मार्ग काढण्यासाठी त्या सेवकाने सॉक्स ड्राय-क्लीन केले आणि त्यांना पुन्हा नवीन लेबल लावले. गंमत म्हणजे त्या सेवकाने काही मोजे पुन्हा निजामालाच विकले. निजामाच्या फ्रेंच फॅशनवरील प्रेमामुळे हा सेवक कोट्यधीश झाला होता.
वयाच्या दुसऱ्या वर्षी मिळालं होतं निजामपद
हैदराबादचे सहावे निजाम असलेले मीर मेहबूब अली खान जेव्हा गादीवर बसले तेव्हा त्यांचं वय फक्त दोन वर्षे 7 महिन्यांचं होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर, 5 फेब्रुवारी 1869 रोजी त्यांना आसफ जाही घराण्याचा सहावा निजाम बनवण्यात आलं होतं. निजाम लहान असल्याने संस्थानाचे कामकाज हाताळण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक रिजन्सी कौन्सिल स्थापन केलं होतं. मेहबूब अली 18 वर्षांचे झाल्यावर त्यांच्याकडे राज्याचं कामकाज सोपवण्यात आलं. ब्रिटिश सरकारचा व्हाईसरॉय लॉर्ड रिपन स्वतः हैदराबादला राज्याभिषेकासाठी गेला होता. मीर मेहबूब अली खान हे 1911 पर्यंत हैदराबादचे शासक होते.