General Knowledge : कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत राजा? संपत्ती ऐकून डोळे चक्रावतील
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या राजाकडे 38 विमानं आहेत. त्यात बोइंग आणि एअरबसचा समावेश आहे. त्यांच्याकडे 21 हेलिकॉप्टर्सही आहेत.
मुंबई : जगात बहुतांश ठिकाणी आता लोकशाही असली, तरी काही ठिकाणी राजेशाहीदेखील अस्तित्वात आहे. थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न हे जगातले सर्वांत श्रीमंत राजे आहेत. त्यांना राजा राम एक्स या नावानेही ओळखलं जातं. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
राजा वजीरालोंगकोर्न यांची नेट वर्थ 43 अब्ज डॉलर्स म्हणजेच तीन लाख कोटी एवढं आहे. त्यांच्या संपत्तीतला एक भाग सिमेंट कंपनी आणि बँक ऑफ थायलंडमधून येतो. फॉक्स बिझनेसच्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की त्यांची संपत्ती 30 अब्ज डॉलर्स ते 45 अब्ज डॉलर्सच्या दरम्यान आहे.
ब्रिटिश राजे किंग चार्ल्स हे जगातले सर्वांत चर्चेत असलेले राजे आहेत. त्यांची संपत्तीही वजीरालोंगकोर्न यांच्यापेक्षा कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार किंग चार्ल्स यांची संपत्ती 747 मिलियन डॉलर्स म्हणजे सहा हजार कोटी आहे. ती वजीरालोंगकोर्न यांच्यापेक्षा खूप कमी आहे. वजीरालोंगकोर्न यांच्या संपत्तीचा मुख्य स्रोत क्राउन प्रॉपर्टी ब्यूरो हा आहे. थायलंडमध्ये 6560 हेक्टरपेक्षा अधिक जमीन या संस्थेच्या नियंत्रणाखाली आहे.
advertisement
राजे वजीरालोंगकोर्न खूप लक्झरी आयुष्य जगतात. त्यांच्याकडे गोल्डन ज्युबिली डायमंड आहे. तो 545.67 कॅरेटचा भुऱ्या रंगाचा हिरा आहे. तो त्यांच्या उत्तम कलेक्शनचा एक भाग आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये चांदी, रत्नं, मोती आणि परदेशी दागिन्यांचा समावेश आहे. या राजांची अनेक बिझनेसमध्येही भागीदारी आहे. सियाम सिमेंट समूह या थायलंडच्या सर्वांत मोठ्या समूहातही त्यांची भागीदारी आहे.
advertisement
या राजाकडे 38 विमानं आहेत. त्यात बोइंग आणि एअरबसचा समावेश आहे. त्यांच्याकडे 21 हेलिकॉप्टर्सही आहेत. त्यांच्या या खासगी हवाई वाहनांवर वार्षिक 524 कोटी रुपये खर्च होतात. लिमोझिन, मर्सिडीज बेंझसारख्या उत्तमोत्तम कार्सही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत.
या राजाचा महाल 2.35 दशलक्ष वर्गफूट क्षेत्रावर पसरलेला आहे. या राजाचे चार विवाह झाले असून, त्यांना चार मुलं आहेत. 2019 साली त्यांना अधिकृतरीत्या राजा करण्यात आलं. त्या वेळी त्यांचं वय 66 वर्षं होतं. त्याआधी त्यांचे वडील भूमिबोल अदुल्यादेज हे राजे होते. त्यांनी 70 वर्षं राज्य केलं. 13 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर तीन वर्षांनी वजीरालोंगकोर्न राजा बनले. भूमिबोल हे जगातले सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या शासकांपैकी एक होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 15, 2024 9:01 AM IST
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत राजा? संपत्ती ऐकून डोळे चक्रावतील