डोसावाल्याचा समोर आलेला व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. डोसावाल्यानं जे म्हटलं ते ऐकल्यावर तुम्हीही चकित व्हाल. तो शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त कमावतो असं त्यांचं म्हणणं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोसावाला चीझ दाखवून व्यक्तीला कोणत्या कंपनीच आहे विचारत आहे. मग व्हिडीओ काढणारा व्यक्ती म्हणतो की मी शिकलेला आहे. यानंतर डोसावाला म्हणतो मी कमी शिकलेला आहे म्हणून जास्त कमावतोय. नाहीतर मलाही 30-40 हजारांची नोकरी करावी लागली असते.
advertisement
@ASHMANTWEET नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 10 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2024 7:51 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : 'कमी शिकलोय त्यामुळेच जास्त कमावतोय'; डोसा विक्रेत्याचा व्हिडीओ पाहून व्हाल चकित
