या भूकंपामुळे बँकोकमधील एक इमारत देखील पत्यांसारखी कोसळली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या सगळ्यात आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओतील दृश्य ही धडकी भरवरणारं आहे.
व्हिडीओच्या सुरुवातील सगळं काही चांगलं सुरु होतं. टेरेसवरील पुलमध्ये लोक चिल करत होते. तर एक कपल एकमेकांमध्ये गुंतलं होतं. वातावरण देखील अगदी गुलाबी असल्यासारखं वाटत होत. पण पुढे असं काही घडणार याचा अंदाज कोणालाच नव्हता, ज्यामुळे एका कपलचा रोमांटिक क्षण काहीच सेकंदात एखाद्या वाईट स्वप्नासारखा समोर आला.
advertisement
तुम्ही व्हिडीओत पाहू शकता स्वीमिंग पुलमधील पाण्यात हळूहळू गोलगोल तरंग येताना दिसत आहेत आणि काही वेळाने सगळंच हादरु लागलं. यानंतर स्वीमिग पुल मधलं पाणी ही जोरजोरात हलू लागलं आणि मोठ्या लाटे प्रमाणे दिसू लागलं. हे सगळं घडताना सगळेच घाबरले आणि ते पाण्याबाहेर येऊ लागले.
हे कपल देखील घाबरलं आणि त्यांनी पाण्याबाहेर धाव घेतली. काही तरी विचित्र घडलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं पण काय घडतंय हे कोणालाच कळत नव्हतं, लोक घाबरले होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.
जागतिक स्तरावर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत भारतासह अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारतात दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याशिवाय आशिया, अमेरिका आणि इतर खंडातील विविध देशांमध्येही भूकंप झाले आहेत आणि आता म्यानमारसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले गेले आहे.