TRENDING:

कोण आहे ही मुस्लिम मिस्ट्री गर्ल? जिने पाकिस्तान हरताच टीम इंडियासोबत साजरा केला विजयाचा जल्लोष

Last Updated:

सोशल मीडियावर या फायनलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, यातील एका व्हिडिओने नेटिझन्समध्ये वेगळीच चर्चा पेटवली आहे. कारण त्यात दिसली एक "मिस्ट्री गर्ल."

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रविवारी झालेला भारत-पाकिस्तान एशिया कपचा फायनल सामना हा केवळ क्रिकेटचा मुकाबला नव्हता, तर एक हाय-व्होल्टेज ड्रामा ठरला. टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत एशिया वर्ल्डकप आपल्या नावे केला. भारतीय टीमने सामना जिंकला पण त्यांनी ट्रॉफी घेतली नाही. त्यामुळे ही घटना आणखीच सोशल मीडियावर गाजली.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

शिवाय सामनावेळी दोन्ही देशांच्या फॅन्सकडून देखील हायवोल्टेज रंगला. भर मैदानात भारतीय चाहत्यांसह इतर देशांचे समर्थकही आनंदाच्या लाटेत सामील झाले. अफगाणिस्तानसारख्या देशातील प्रेक्षकांनीही भारताला सपोर्ट करत वातावरण रंगवून टाकलं.

या सामन्याच्या आठवणी इथेच संपल्या नाहीत. सोशल मीडियावर या फायनलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, यातील एका व्हिडिओने नेटिझन्समध्ये वेगळीच चर्चा पेटवली आहे. कारण त्यात दिसली एक "मिस्ट्री गर्ल."

advertisement

कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?

व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर भारतीय संघ मैदानात निवांत बसलेला दिसतो आणि विनिंग सेरेमनीची वाट पाहतोय. याचवेळी स्टँडमध्ये बसलेली एक युवती मोबाईलवर व्हिडिओ शूट करताना दिसते. भारतीय ध्वजाची ओढणी खांद्यावर घेतलेल्या या मुलीने व्हिडिओ कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला: "बधाई हो इंडिया."

त्यानंतर या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि आता ही भारताला सपोर्ट करणारी सुंदर तरुणी कोण आहे? तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक गुगलवर तिच्याबद्दल शोधू लागले आहेत.

advertisement

लवकरच कळलं की ही युवती म्हणजे वजहमा अयूबी, जी मूळची अफगाणिस्तानची आहे. कारण एवढंच नाही, ती नेहमीच भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात दिसत असते.

advertisement

या व्हिडिओनंतर कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. कुणी तिलक वर्माच्या परफॉर्मन्सशी तुलना करत लिहिलं: “शर्मा जी नाहीतर वर्मा जी बरोबर, तिलक वर्माने भारताच्या कपाळावर विजयाचा तिलक लावला.” असं देखील लोक म्हणत आहेत. तर दुसऱ्याने विनोद करत म्हटलं, “पाकिस्तान टीमनं तुम्हाला पाहिलं आणि पॅव्हेलियनचं दृश्य मैदानापेक्षा सुंदर आहे असं ठरवलं, त्यामुळे सगळे बाद झाले.” अनेकांनी तर वजहमाला भारताची लकी चार्म असल्याचं म्हटलं.

advertisement

फायनलमध्ये अजून एक मजेशीर प्रसंग घडला. पराभवानं बिथरलेले पाकिस्तानचे गृहमंत्री आणि एसीसी-पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी ट्रॉफीच उचलून नेली, त्यामुळे भारताला ट्रॉफीशिवायच जल्लोष करावा लागला. मात्र, मैदानात भारतीय चाहत्यांनी आणि वजहमासारख्या समर्थकांनी जल्लोषात कोणतीही कमी पडू दिली नाही.

मराठी बातम्या/Viral/
कोण आहे ही मुस्लिम मिस्ट्री गर्ल? जिने पाकिस्तान हरताच टीम इंडियासोबत साजरा केला विजयाचा जल्लोष
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल