TRENDING:

Indian Railway : कसं करायचं कन्फर्म तत्काळ तिकीट बुक, ही ट्रिक तुमच्या कामाची

Last Updated:

शिवाय तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नाही. कारण तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंग विंडोची एक निश्चित वेळ असते आणि प्रत्येकजण एकाच वेळी बुकिंग करतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय रेल्वेने लाखो करोडो लोक प्रवास करतात. हा प्रवास कमी खर्चीक असतो शिवाय हा सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो. ज्यामुळे लोक यानेच प्रवास करतात. पण यामध्ये एक समस्या सर्वांसाठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे कन्फर्म तिकीट बुकिंगची. तिकिट कन्फर्म मिळालं नाही की लोक वळतात ते तत्काळ तिकीटाकडे. परंतू ते देखी प्रत्येकी वेळी मिळतच असं नाही.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

शिवाय तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नाही. कारण तत्काळ रेल्वे तिकीट बुकिंग विंडोची एक निश्चित वेळ असते आणि प्रत्येकजण एकाच वेळी बुकिंग करतो. त्यामुळे ते देखील मिळण्याची शक्यता फार कमी आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला तत्काळ ट्रेनचे तिकीट कसे बुक करायचे ते सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.

advertisement

एसी क्लासच्या तिकिटांसाठी (2A/3A/CC/EC/3E) बुकिंग विंडो सकाळी 10:00 वाजता उघडते, तर नॉन-एसी क्लाससाठी (SL/FC/2S) तत्काळ तिकिटे सकाळी 11:00 वाजेपासून बुक करता येतात.

याचा अर्थ एसी क्लासचे प्रवासी बुकिंगसाठी सकाळी 10:00 वाजेपर्यंत थांबू शकतात आणि नॉन-एसी क्लासच्या प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळविण्यासाठी 11:00 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

आगाऊ बुक करा: तुम्ही जितक्या लवकर तिकीट बुक कराल तितकी ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, जर तुम्हाला कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट बुक करायचे असेल तर निघण्याच्या तारखेच्या किमान दोन दिवस आधी किंवा त्याही आधी बुक करा. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असेल जो तुम्हाला तिकीट कन्फर्मेशन आणि कन्फर्म सीट मिळण्यासाठी मदत करेल.

advertisement

एकापेक्षा जास्त उपकरण वापरा

तुमच्याकडे संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन यांसारखी उपकरणे असतील, तर ती सर्व वापरून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. म्हणून, जर तुम्हाला कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही तुमची सर्व साधने वापरून लवकरात लवकर बुक करा.

आधीच माहिती भरा

तिकीट बुक करण्यासाठी बुकिंग फॉर्म भरताना, वेळ वाचवण्यासाठी तुम्ही तुमचे सर्व वैयक्तिक माहिती आधीच भरुन ठेवा. तसेच तुमच्या सह-प्रवाश्यांची माहिती आपल्या हातात ठेवू शकता. यामुळे, तुम्ही भरलेला फॉर्म लवकर पूर्ण होईल आणि तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

जलद इंटरनेट कनेक्शन वापरा: तुमचे तिकीट अधिक जलद बुक करण्यात मदत करण्यासाठी, जलद इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे, तिकीट बुक करण्यापूर्वी तुमच्याकडे चांगले आणि जलद इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा.

मराठी बातम्या/Viral/
Indian Railway : कसं करायचं कन्फर्म तत्काळ तिकीट बुक, ही ट्रिक तुमच्या कामाची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल