1 ऑक्टोबर रोजी पूर्व जावा प्रांतातील पॅकिटन रीजेंसी येथे हा भव्य लग्नसोहळा पार पडला. या ठिकाणी तरमन नावाच्या 74 वर्षीय व्यक्तीनं 24 वर्षीय शीळा अरिका हिच्याशी लग्न केलं. हा विवाह जाहीररीत्या पार पडला आणि त्यात शेकडो पाहुणे उपस्थित होते.
सुरुवातीला शीळाच्या दहेजाची किंमत सुमारे 60 लाख रुपये असल्याचं सांगितलं गेलं होतं. मात्र समारंभाच्या वेळीच ती अचानक वाढवून 1.5 कोटी रुपये इतकी करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसतं की नवरदेवानं चेकच्या स्वरूपात ही रक्कम नववधूला दिली आणि त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
advertisement
या आलिशान लग्नानंतर काही दिवसांतच वाद निर्माण झाला. कारण लग्नाची फोटोग्राफी करणाऱ्या कंपनीने सार्वजनिकपणे आरोप केला की नवविवाहित जोडप्यानं त्याच्या फोटोग्राफीचे पैसे न देता संपर्क तोडला. यानंतर या घटनेची चर्चा सोशल मीडियावर झपाट्यानं पसरली.
काहींनी असा आरोप केला की तरमन आणि शीळा लग्न संपताच नववधूच्या घरच्या मोटारसायकलवर बसून पळून गेले. इतकंच नव्हे, तर काहींनी तर असा संशयही व्यक्त केला की दहेज म्हणून दिलेला चेक खोटा असू शकतो.
या सर्व चर्चेनंतर तरमन यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केलं की त्यांनी दिलेली रक्कम खरी असून ती इंडोनेशियाच्या बँक सेंट्रल एशिया (BCA) मधून आली आहे. तसेच त्यांनी या अफवांना फेटाळून लावलं की ते लग्नानंतर पळून गेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “मी माझ्या पत्नीला सोडलेलं नाही. आम्ही आजही एकत्र आहोत.”
नववधूच्या कुटुंबीयांनीही या वक्तव्याला पुष्टी देत सांगितलं की ते दोघे हनीमूनसाठी बाहेर गेले होते, त्यामुळे गैरसमज झाला.
दरम्यान, स्थानिक पोलिसांनी फोटोग्राफी कंपनीच्या तक्रारीवरून चौकशी सुरू केली आहे. लग्नाशी संबंधित ही घटना आता इंडोनेशियात चर्चेचा प्रमुख विषय ठरली असून, अनेक लोक या वयात आणि इतक्या मोठ्या दहेजावर झालेल्या विवाहाबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.