TRENDING:

कोणाला सुटकेस, कोणाला एअर फ्रायर, तर कोणाला 6 दिवस सुट्टी; तुम्हाला दिवाळीला काय मिळालं?

Last Updated:

सीईओने स्वतः कर्मचाऱ्यांना “मजा करा आणि भरपूर झोपा” असे सांगून त्यांचा सण अधिक गोड केला. हे ऐकून अनेकांनी सोशल मीडियावर या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळी म्हणजे सणांचा आणि आनंदाचा काळ आणि या काळात कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंची नेहमीच चर्चा होत असते. कोणाला काय गिफ्ट मिळतंय कोणती कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काय काय देतेय? याबद्दल आता सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. काही कंपन्या बोनस किंवा सुट्टी देतात, तर काही आकर्षक गिफ्ट्सद्वारे कर्मचाऱ्यांचा सण अधिक खास करतात. अलीकडेच एका पीआर कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना सलग 9 दिवसांची सुट्टी दिली आणि या काळात ईमेल किंवा चॅट न पाहण्याचा सल्ला दिला.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

सीईओने स्वतः कर्मचाऱ्यांना “मजा करा आणि भरपूर झोपा” असे सांगून त्यांचा सण अधिक गोड केला. हे ऐकून अनेकांनी सोशल मीडियावर या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर आता ऑनलाइन प्लॅटफॉर्म पुरवणारी नामांकित कंपनी इन्फो एज (Info Edge) देखील चर्चेत आली आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त गिफ्ट्सने भरलेली एक आलिशान सूटकेस भेट दिली आहे. त्यात स्वादिष्ट स्नॅक्सचा सुंदर बॉक्स आणि एक पारंपरिक दिवा देखील ठेवण्यात आला आहे.

advertisement

ऑफिसमध्ये प्रत्येक डेस्कवर एकसारख्या पॅकिंगमध्ये हे गिफ्ट्स ठेवलेले दिसतात आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण सणासुदीचे वाटते. अनेक कर्मचाऱ्यांनी या क्षणाचे व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर शेअर केले, ज्यांना लाखो व्ह्यूज मिळाले.

कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि लोकांची प्रतिक्रिया

या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी लिहिले, “कृपया मला इथे रेफर करा”, तर काहींनी आपल्या कंपनीबद्दल नाराजी व्यक्त करत “आमच्या कंपनीत असं गिफ्ट का नाही मिळत?” असे विचारले.

advertisement

आणखी काही व्हायरल रिल्समधील गिफ्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

एक आणखी व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्याला एअरफ्रायर, 2000 रुपयाचं वाउचर, सोबतच चांदिचं कॉइन आणि कुनाफा गिफ्ट केलं आहे. याचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होतंय. कुणी हे गिफ्ट पाहून आनंदी झालं आहे तर कुणी एवढंच दिलं का? असा प्रश्न उपस्थीत केला आहे.

मराठी बातम्या/Viral/
कोणाला सुटकेस, कोणाला एअर फ्रायर, तर कोणाला 6 दिवस सुट्टी; तुम्हाला दिवाळीला काय मिळालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल