लग्नात पैसै उधळण्याचा व्हिडीओ समोर येताच इंटरनेटवर एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र सोनं फेकतानाचा व्हिडीओ पाहून अनेकांना या कृतीवर संतापही व्यक्त केलाय.
Shocking News : स्वतःच्या फायद्यासाठी महिला 17 वेळा राहिली प्रेग्नंट, धक्कादायक घटना
चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न समारंभ सुरु आहे आणि वधू दिसतेय. वधूवर एक महिला आणि व्यक्ती सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव करत आहेत. दोघेही जोमानं सोनं उधळत आहे जणू महिला आणि त्या व्यक्तीमध्ये स्पर्धाच लागलीय. याशिवाय बाकीचे काही लोक मधे घुसून हे सोनं उचलून नेत होते.
advertisement
Muhammad Ahmad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आणि लोकांनी यावर कमेंट करायला सुरुवात केली.
दरम्याम, लग्नातील बरेच व्हिडीओ चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. यातील अनेक हटके, मजेशीर, विचित्र, धक्कादायक प्रकार समोर येत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होतात.
