Shocking News : स्वतःच्या फायद्यासाठी महिला 17 वेळा राहिली प्रेग्नंट, धक्कादायक घटना

Last Updated:

आईला देवाचा दर्जा दिला जातो. कारण ती आपल्या मुलांसाठी होईल तेवढी धडपड, कष्ट, तडजोड करत असते. आईच आपल्या मुलांवर बिनशर्त प्रेम करत असते. आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी खास क्षण असतो.

स्वतःच्या फायद्यासाठी महिला 17 वेळा राहिली प्रेग्नंट
स्वतःच्या फायद्यासाठी महिला 17 वेळा राहिली प्रेग्नंट
नवी दिल्ली : आईला देवाचा दर्जा दिला जातो. कारण ती आपल्या मुलांसाठी होईल तेवढी धडपड, कष्ट, तडजोड करत असते. आईच आपल्या मुलांवर बिनशर्त प्रेम करत असते. आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी खास क्षण असतो. या क्षणासाठी महिला खूप आतुरतेनं वाट पाहत असतात. तुम्ही महिला एक, दोन, तीन, पाच वेळा प्रेग्नंट राहिल्याचं ऐकलं असेल मात्र कधी एखादी महिला 17 वेळा प्रेग्नंच राहिल्याविषयी ऐकलंय का? सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एक महिला चक्क 17 वेळा प्रेग्नंट राहिली. यामागचं सत्य समोर येताच अनेकांना धक्काच बसला.
एका महिला स्वतःच्या फायद्यासाठी 17 वेळा प्रेग्नंट राहिल्याची घटना समोर आलीय. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. इटलीतून समोर आलेली ही घटना वाचून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
17 वेळा प्रेग्नंसीच्या फायद्यासाठी आणि सुट्टीसाठी महिला खोटं बोलली. महिलेच्या या कृत्याबाबत अधिकाऱ्यांना संशय आला आणि तिची चौकशी करताच तिचा खोटा प्लॅन उघड झाला. आपल्या फायद्यासाठी खोटं बोलणाऱ्या या महिलेचं नाव बार्बरा आहे.
advertisement
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बार्बराने तिच्या सर्वात लहान मुलाला जन्म दिल्याचं सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलीस बार्बरा यांच्यावर बारीक नजर ठेवून होते. यावेळी पोलिसांना बार्बरा कधीच गरोदर नसल्याचे पुरावे मिळाले. ती फक्त गरोदर असल्याचं नाटक करत होती. पोलिसांनी सांगितलं की, एक कोटी रुपयांचे फायदे मिळवण्यासाठी आणि कामातून वेळ मिळावा म्हणून तिनं 17 बनावट प्रेग्नंसीचा प्लॅन केला.
advertisement
चौकशीनंतर सत्य समोर आलं की ती महिला कधीच गरोदर राहिली नव्हती आणि ती केवळ गर्भधारणेच्या फायद्यासाठी असं करत होती. मात्र, महिलेनं कागदपत्रांमध्ये 5 मुलांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. आजपर्यंत त्या मुलांना कोणी पाहिलं नाही.
याविषयी बोलताना बार्बरा म्हणते की, ती 17 वेळा आई होणार होती, पण तिला 12 वेळा गर्भपाताच्या परिस्थितीतून जावं लागलं. तिनं बेनेडेटा, अँजेलिका, अब्रामो, लेटिझिया आणि इस्माईल नावाच्या 5 मुलांना जन्म दिल्याचं सांगितलं परंतु तिच्याकडे या गोष्टींचा कोणताही पुरावा नाही. तिच्या पतीला विचारलं असता त्यानं सांगितलं की, त्याची पत्नी गरोदर नसल्याचं सांगितलं. त्यानंतर बार्बरासा अटक करण्यात आली आणि ती आता शिक्षा भोगत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Shocking News : स्वतःच्या फायद्यासाठी महिला 17 वेळा राहिली प्रेग्नंट, धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement