Funny Video : सिंगल तरुणानं गर्लफ्रेंडसाठी लढवली हटके शक्कल, पाहून आवरणार नाही हसू

Last Updated:

आजकाल कमी वयातच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचं पहायला मिळतं. मात्र जे लोक सिंगल आहेत, ज्यांना कोणी साथीदार नाही यांचेही निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात.

सिंगल तरुणानं गर्लफ्रेंडसाठी लढवली हटके शक्कल
सिंगल तरुणानं गर्लफ्रेंडसाठी लढवली हटके शक्कल
नवी दिल्ली : आजकाल कमी वयातच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असल्याचं पहायला मिळतं. मात्र जे लोक सिंगल आहेत, ज्यांना कोणी साथीदार नाही यांचेही निरनिराळे व्हिडीओ समोर येत असतात. अशाच सिंगल असलेल्या तरुणानं गर्लफेंड नाही म्हणून जी काही हटके आयडिया शोधली ती पाहून अनेक लोक चकित झाले, त्यांना हसूही आवरलं नाही. तरुणाचा हा हटके गर्लफ्रेंडचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
एका तरुणाला गर्लफ्रेंड नाही म्हणून हटके जुगाड शोधून काढला. त्यानं जे काही केलं ते पाहून तुम्हालाही हसू येईल. तरुणानं एका डमीला आपली गर्लफेंड बनवलं आणि तो एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं या डमी गर्लफ्रेंडला गाडीवर बसवून बाहेरही फिरवलं. तरुणाचं हे धाडस पाहून बाकीचे लोकही शॉक झाले. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकांची रिअॅक्शन कैद करण्यात आली आहे.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण बाईक घेऊन फिरत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या गाडीवर मागे बसलेली गर्लफ्रेंड. तरुणानं त्याच्या बाईकवर मागे एक डमी गर्लफ्रेंड बसवली होती. बाहेर तरुण या डमी गर्लफ्रेंडला घेऊन फिरतोय. तरुणाचा हा कारनामा पाहून लोकही हसत होते. व्हिडीओमध्ये लोकांच्या निरनिराळ्या रिअॅक्शन दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही हसू आवरु शकत नाही.
advertisement
advertisement
Ashfaq Ahmed नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ उडवताना दिसून आला. व्हिडीओवर अनेक लाईक्स, कमेंट येत असून अनेकांनी व्हिडीओ शेअरही केला आहे. समोर आलेला हा व्हिडीओ इंदौरचा असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओवर लिहिलं की, हे फक्त इंदौरमध्येच शक्य आहे.
दरम्यान, हा सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याचं म्हटलं जातंय. लोक आजकाल सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतात. हटको गोष्टी करुन लोक लोकांचं लक्ष वेधून घेत असतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Funny Video : सिंगल तरुणानं गर्लफ्रेंडसाठी लढवली हटके शक्कल, पाहून आवरणार नाही हसू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement