बेंगळुरूच्या प्रवाशाचा प्रश्न : बेंगळुरूच्या किरण कुमार नावाच्या व्यक्तीने कर्नाटक सरकारद्वारे महिलांना देण्यात येणाऱ्या मोफत बस प्रवासावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची पोस्ट 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे आणि 1500 हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत.
किरण कुमार यांनी मांडलेले 6 महत्त्वाचे मुद्दे
- बसमध्ये 50 प्रवाशांपैकी 30 महिला होत्या, ज्या फक्त आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास करत होत्या. हे योग्य आहे का? ही समानता आहे का?
- उर्वरित 20 लोक पूर्ण बसचे भाडे भरत आहेत, हे योग्य आहे का?एका बाजूला एक वृद्ध व्यक्ती तिकीट काढण्यासाठी खिशात पैसे शोधत होता, तर दुसरीकडे एक तरुण महिला व्हिडिओ कॉलवर बोलत मोफत प्रवास करत होती, हे योग्य आहे का?
- जर सरकारकडे इतका अतिरिक्त पैसा आहे, तर तो उर्वरित 20 लोकांसाठी बस सेवा मोफत का करत नाही? सर्वांसाठी मोफत बस सेवा का सुरू करत नाही?
- जगभरात, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना सवलती आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. येथे बेंगळुरू आणि म्हैसूरसारख्या समृद्ध शहरांतील महिला मोफत प्रवास करत आहेत, कारण ती योजना उपलब्ध आहे. हे योग्य आहे का?
- हाच मोफत पैसा शहरांतील कचरा साफ करण्यासाठी, खड्डे बुजवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी का वापरला जाऊ शकत नाही?
- शेवटी, किरण कुमार यांनी लिहिले की, मतांसाठी मोफत भेटवस्तू (रेवड्या वाटणे) देण्याच्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत आणि यातून लवकर बाहेर पडणे कठीण आहे.
advertisement
राजकीय प्रतिक्रिया : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या निर्णयावर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप आमदार महेश टी. यांनी म्हटले आहे की, "काँग्रेस सरकारला दीड वर्षातच कळाले की, मोफत योजना चालवणे कठीण आहे, त्यामुळे एका बाजूला महिलांना मोफत प्रवास देत आहेत, तर दुसरीकडे भाड्यात 20 ते 30 टक्क्यांची वाढ करत आहेत."
समर्थन आणि युक्तिवाद : काही लोकांनी असा युक्तिवाद केला आहे की, या योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्याद्वारे महिला सहजपणे कामावर जाऊन पैसे कमवू शकतील.
हे ही वाचा : बाप रे! रेल्वे रुळावर आला 'सिंह', वनरक्षकाने काठीने सहज हाकललं, पहा VIDEO
हे ही वाचा : ब्लॅक काॅफी जास्त आवडते? ही सवय पडू शकते महागात, डाॅक्टरांनी सांगितले दुष्परिणाम