असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं, ज्यामुळे टॅटू काढलेली महिला आणि त्याचा आर्टिस्ट दोघंही अडचणीत आले आहेत.
एका महिलेचा टॅटू व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन टॅटू आर्टिस्टला अटक केली आहे, यामध्ये 'रॉकी टॅटूज'चे मालक 33 वर्षांचे रॉकी रंजन बिसॉय आणि त्यांचे कर्मचारी 25 वर्षांचे अस्विनी कुमार प्रधान यांचा समावेश आहे. आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल ही या महिलेनं असं कोणता टॅटू काढला ज्यामुळे चक्क टॅटू आर्टिस्टला अटक केली गेली? टॅटू तर सगळेच काढतात पण मग यावेळी असं काय घडलं?
advertisement
खरंतर एका विदेशी महिलेनं आपल्या जांघेवर टॅटू का काढला, हा एखादा साधा टॅटू नाही तर भगवान जगन्नाथाचा टॅटू आहे. ज्यामुळे हा एवढा मोठा गोंधळ उडाला.
ही महिला इटलीची मूळ निवासी असून कंधामाल येथील एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करते. तिने शनिवारी एका टॅटू आर्टिस्टकडे जाऊन आपल्या जांघेवर टॅटू काढून घेतला.
परंतु, या प्रकरणात खळबळ तेव्हा निर्माण झाली जेव्हा बिसॉयने (टॅटू स्टुडिओटचा मालक) त्या महिलेचा फोटो आणि त्यावरचा टॅटू आपला WhatsApp स्टेटसवर पोस्ट केला. हा फोटो सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. लवकरच बिसॉयने हा स्टेटस हटवला.
या घटनेच्या संदर्भात साहिद नगर पोलिस ठाण्यात सुब्रता कुमार मोहंती यांनी तक्रार दाखल केली आहे.
या विवादानंतर, त्या महिलेनं एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यामध्ये माफी देखील मागितली आहे. या व्हिडीओत ती इटालियन महिला म्हणाली "माझी खरी भक्ती आहे आणि मी दररोज मंदिर जाते. माझा कोणत्याही प्रकारे अपमान करायचा हेतू नव्हता. टॅटू पूर्ण बरा झाल्यावर मी त्याला काढून टाकेन. माझी चूक झाली, मला खूप वाईट वाटत आहे."
तर या घटनेवर टॅटू शॉप मालक म्हणाले, "मी मनापासून माफी मागतो. आमच्या स्टुडिओत हा टॅटू बनला, आणि कलाकाराच्या वतीनेही मी माफी मागतो." त्यांनी असे देखील सांगितले की, "महिला स्वतःच्या निवडीने जांघेवर हा टॅटू करवून घेतली, जरी त्यांना योग्य स्थानाबद्दल सल्ला दिला होता. पण ती एका स्वयंसेवी संस्थेत काम करते जिथे तिला टॅटू काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे मग तीने जांघेवर टॅटू काढून घेतला."
या घटनेने फक्त टॅटू कल्चरच नव्हे तर धार्मिक संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणाच्या चर्चा अजूनही चालू असून, भविष्यात अशा घटनेपासून लोकांना खबरदारी घ्यावी असं देखील सोशल मीडियावर बोललं जात आहे.
