सध्या दोन तरुणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये दोन तरुणी स्टंटबाजी करत एकमेकींना मिठी मारत, किस करताना दिसल्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
चर्चेत आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुली रस्त्यावर बाईक चालवत स्टंटबाजी करत आहेत. दोघी एकमेकींकडे तोंड करुन बसल्या आहेत. हॅंडल सोडून गाडी भरधाव वेगानं धावताना दिसतेय. या धावत्या गाडीवर दोघी एकमेकींना किस करत आणि मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर विविध प्रकराच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या कृतीवर संताप व्यक्त केलाय. या व्हिडीओनं पुन्हा एकदा खळबळ उडालीय. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे स्पष्ट झालं नाही.
