गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तांदळात बांगडी टाकण्याचा फायदा दाखवला आहे. तांदळात बांगडी टाकल्याने काय होते, ते तिने या व्हिडीओत दाखवलं आहे.
Kitchen Jugaad Video : झाडूला लॉक आणि मोठ्या समस्येतून सुटका, जबरदस्त जुगाड
advertisement
महिलेने सांगितल्यानुसार एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी टाका. यात एक बांगडी टाका. दुसरं भांडं घ्या. त्यानंतर तांदळाचं भांडं हलवून घ्या. बांगडी तांदळाच्या आत तळाशी जाईल. तांदूळ वर येतील. आता हातावर हळूहळू थोडे तांदूळ आणि पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या. अशी प्रक्रिया हळूहळू शेवटपर्यंत करत राहा.
आता शेवटी जे तांदूळ उरतील त्यात तुम्हाला दगड दिसतील. सर्व दगड भांड्याच्या तळाशी राहतात. बऱ्यादा तांदळात असे दगड असतात. त्यामुळे तांदूळ निवडावे लागतात. तरी एखाद दुसरा दगड तांदळात राहतो आणि मग भात खाताना तो तोंडात येतो. पण या पद्धतीने तांदळात एकही दगड राहणार नाही. शिवाय तांदळातील प्रत्येक दगड काढणं सोपं होईल. जिथं तांदूळ निवडून दगड काढायला वेळ जातो, तिथं या ट्रिकने काही वेळातच तांदळातील दगड काढता येतील.
Vardan Pakwan युट्यूटब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
Kitchen Jugaad : मेणबत्ती लावायची तर नळावर, मोठा फायदा, VIDEO मध्ये पाहा परिणाम
महिलेने सांगितल्यानुसार तांदूळ निवडण्याची ही ट्रिक खूप जुनी आहे. तुम्हीही ही ट्रिक वापरत होता का? नाहीतर एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.