उंदरांना घरातून बाहेर पळवण्यासाठी आपण काय काय नाही करत. पण एखाद्या उंदराला घराबाहेर काढलं की दुसऱ्यादिवशी घरात उंदीर दिसतोच तो कुठून आलेला असतो काय माहिती नाही. पण उंदरांपासून सुटका काही मिळत नाही. आता कंगव्याने उंदीर पळवून पाहा. एका महिलेने हा जुगाड दाखवला आहे.
एक चमचा चण्याची डाळ घ्या, त्यात, कोणत्याही एक्स्पायर झालेल्या औषधाच्या एका गोळीची पूड करून टाका. देशी घी घ्या. यामुळे उंदीर आकर्षित होतील आणि उंदारांना गोळीचा वासही येणार नाही. नंतर यात बेकिंग सोडा, गव्हाचं पीठ आणि थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घ्या.
advertisement
Kitchen Jugaad Video : शॅम्पू असा वापरून पाहा, घरातील सगळे उंदीर पळून जातील, पुन्हा येणार नाहीत
आता खराब झालेला प्लॅस्टिकचा कंगवा, प्लॅस्टिकचं एखादं झाकण, कापूस किंवा पेपर घ्या. कापसाचे छोटे छोटे तुकडे करून तयार केलेलं मिश्रण या कापसावर लावा. जिथं उंदीर असतात तिथं मिश्रण लावलेलं कापूस ठेवा. उंदीर नेमके कुठून येतात तिथं हे मिश्रण ठेवा. किचनवर, सोफ्याच्या खाली, बेडखाली, कपाटाखाली, दरवाज्याच्या मागे. जर तुमच्या घरातील उंदरांनी प्लॅस्टिक कुरतडलं असेल तर प्लॅस्टिकचा वापर करा. डब्याचं झाकण घेऊन त्यावर मिश्रण ठेवलेलं कॉटन ठेवून द्या. आता यात कंगव्याचा वापर कुठे आहे, असं तुम्ही म्हणाल. तर कंगव्यावरसुद्धा ही पेस्ट लावून घ्या आणि मुख्य दरवाजा ज्याच्याखाली थोडी गॅप असते तिथं हा ठेवा.
हे मिश्रण थोडं जरी उंदरांच्या पोटात गेलं तरी काम करणं सुरू करेल. तूप, गव्हाचं पीठ असल्याने हे मिश्रण उंदरांना आकर्षिक करेल. तर औषधाची गोळी आणि बेकिंग सोड्यामुळे उंदरांना अस्वस्थ वाटेल आणि ते घराबाहेर पळून जातील असा दावा महिलेने व्हिडीओत केला आहे.
Kitchen Jugaad For Diwali : तेलकट, काळेकुट्ट झालेली स्टीलची भांडी न घासता साफ करा तेही एका मिनिटात
Avika Rawat Foods युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड पाहाल तर तुम्हीसुद्धा कराल.