Kitchen Jugaad Video : शॅम्पू असा वापरून पाहा, घरातील सगळे उंदीर पळून जातील, पुन्हा येणार नाहीत

Last Updated:

Kitchen Tips Marathi : शॅम्पूचा वापर आपण कशासाठी करतो तर केस धुण्यासाठी पण तुम्ही शॅम्पूने उंदीरही पळवता येतात हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.

News18
News18
मुंबई : कित्येक घरातील समस्या आहेत ते म्हणजे. उंदरांना पकडण्यासाठी बरेच पर्याय आहेत. कुणी पिंजरा लावतं, कुणी पुठ्ठा लावतं. पण आता उंदरांनाही याबाबत माहिती झाली आहे. त्यामुळे उंदीर या जाळ्यात अडकत नाहीत. पण आता उंदरांना घरातून पळवण्याचा जबरदस्त असा जुगाड. तुम्ही साध्या शॅम्पूनेही उंदीर पळवू शकता. आता ते कसं? ते पाहुयात
शॅम्पूचा वापर आपण कशासाठी करतो तर केस धुण्यासाठी पण तुम्ही शॅम्पूने उंदीरही पळवता येतात हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. शॅम्पूने उंदीर कसे काय पळतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर शॅम्पूच्या मदतीने उंदरांपासून सुटका मिळवण्याचा हा जबरदस्त असा किचन जुगाड. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
advertisement
यासाठी तुम्ही जेवणासाठी किंवा काही खाण्यासाठी वापरत नाही असं एक भांडं घ्या. त्यात दीड चमचा गव्हाचं पीठ आणि तिखट मिरची मसाला टाका. लाल मसाल्याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता पण ती तिखट असावी. आता पाणी घालून भजीचं पीठ बनवतो, तितकं पातळ पीठ बनवा.
आता एक कापड घ्या. तुम्ही रूमाल घेऊ शकता.  एखादा ब्रश, टुथब्रश घ्या आणि तयार केलेलं मिश्रण संपूर्ण कापडावर पसरवून घ्या. त्यावर कपूरची पूड करून टाका.  फिनाईलच्या गोळ्याही वापरू शकता. हा कपडा गॅसखाली ठेवा किंवा जिथं उंदीर येतात तिथं ठेवा. तुम्ही या कापडाचे छोटे तुकडेही करून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू शकता. पण जिथं ठेवाल तिथं याच्या बाजूला खाद्यपदार्थ ठेवू नका.
advertisement
उंदीर कपडे कुरतडतात. त्यामुळे ते या कपड्याकडेही आकर्षित होतील. त्यावर लावलेल्या मिश्रणात कपूर किंवी फिनाईलच्या गोळ्या आहेत, ज्याचा वास तीव्र असतो आणि उंदरांना तो सहन होत नाही. तसं या मिश्रणात टाकलेला शॅम्पू जो खाण्यापिण्यात गेला तर त्याचे दुष्परिणाम होता. हा शॅम्पू उंदराच्या पोटात गेला तर तो मरणार नाही पण त्याच्या पोटात त्याचा परिणाम होईल. त्याला अस्वस्थ वाटेल आणि तो घरातून पळून जाईल, पुन्हा येणार नाही, आला तरी पुन्हा पळेल, असा दावा या व्हिडीओत महिलेने केला आहे.
advertisement
advertisement
सूचना : हा लेख व्हायरल व्हिडीओतील माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : शॅम्पू असा वापरून पाहा, घरातील सगळे उंदीर पळून जातील, पुन्हा येणार नाहीत
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement