बरेच लोक आहेत जे संध्याकाळी दरवाजात दिवा लावतात. पावसाळ्यात या साध्या दिव्यासोबत तुम्ही लिंबाचा दिवाही लावा. पावसाळ्यात लिंबाचा दिवा लावण्याचा खूप मोठा फायदा आहे. एक नाही तर 4-4 समस्यांतून तुमची सुटका होईल. त्या नेमक्या कोणत्या त्या पाहण्याआधी लिंबाचा दिवा बनवायचा कसा ते पाहूयात.
Kitchen Jugaad Video : टॉयलेटमध्ये लाल मसाल्याची 'जादू', विचित्र उपाय पण फायदा जबरदस्त
advertisement
कसा बनवायचा लिंबाचा दिवा?
एक लिंबू घेऊन त्याचा वरील थोडा भाग कापून घ्या. आता लिंबाच्या आतील रस गर काढून टाका. गर काढताना लिंबाला चीर पडणार नाही याची काळजी घ्या.
आता 3-4 लवंग, थोडं कापूर घेऊन त्याची पूड करा. ही पूड लिंबात टाका. त्यात कडुनिंबाचं तेल टाका. कडुनिंबाचं तेल नसेल तर तुम्ही मोहरीचं तेलही वापरू शकता. आता यात कापसाची फूल वात ठेवा. त्याच्या बाजूने पुन्हा थोडं तेल टाका. हा दिवा पणतीमध्ये ठेवा.
Kitchen Jugaad Video : घरभर प्लॅस्टिक बाटली फिरवा आणि पाहा जादुई परिणाम
लिंबाच्या दिव्याचा फायदा काय?
पावसाळ्यात डास, माश्या, चिलटे यांचा त्रास खूप होतो. शिवाय कुबट असा वास येतो. लिंबाचा हा दिवा या सर्व समस्यांपासून मुक्ती देईल, असा दावा या व्हिडिओ मध्ये करण्यात आला आहे.
Simply marathi यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)