Kitchen Jugaad Video : घरभर प्लॅस्टिक बाटली फिरवा आणि पाहा जादुई परिणाम

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : पाणी किंवा कोल्ड ड्रिंकच्या बाटल्या रिकाम्या झाल्या की शक्यतो त्या आपण कचर्‍यात फेकतो. पण ही बाटली इतकी कामाची आहे की तुम्ही विचारही केला नसाल. दिवाळीत साफसफाई सारखं मोठं मेहनतीचं काम या बातमीमुळे हलकं होईल.

News18
News18
नवी दिल्ली : आपण कुठे बाहेर फिरायला गेलो की पाणी, कोल्ड ड्रिंकची बाटली हमखास घेतो. किंवा घरी पाहुणे आले की त्यांच्यासाठीसुद्धा कोल्ड ड्रिंक आणतो. उन्हाळ्यात तर फ्रिजमध्ये कोल्ड ड्रिंकची बाटली असतेच. पाणी असो वा कोल्ड ड्रिंक याची बाटली असते ती प्लॅस्टिकची. त्यामुळे ती रिकामी झाली की आपण फेकून देतो. पण ही बाटली इतकी कामाची आहे की तुम्ही विचारही केला नसाल.
प्लॅस्टिक बाटलीचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार प्लॅस्टिक बाटली घ्यायची. त्यावरील लेबल काढून टाकायचं. एक लांब पाइप, काठी किंवा दांडा घ्या. हा पाईप बाटलीत जाईल असा होल बाटलीच्या मधोमध पाडा. त्यात पाईप घुसवा. बाटली हलणार नाही अशा पद्धतीने  ती पाइपवर घट्ट बसवा. एक जुना टीशर्ट पाण्यात भिजवून घ्या आणि तो त्या पाइपला लावलेल्या बाटलीला गुंडाळा.
advertisement
आता याचा फायदा काय? तर हा तुमचा होममेड क्लीनर वाइप तयार झाला. हा तुम्ही जमिनीवर  फिरवला की जमीन आणि भिंतीवर फिरवला की भिंत स्वच्छ होईल. उंचावर असलेल्या वस्तूही तुम्ही या पद्धतीने स्वच्छ करू शकता. तुम्हाला हात लावून किंवा खाली वाकून स्वच्छता करायची गरज नाही. अगदी काही तासात फार  मेहनत न घेता तुम्ही घर स्वच्छ करू शकता.
advertisement
Ayeshas kitchen hack यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
तुम्हाला हा जुगाड कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे असे काही किचन जुगाड असतील तर तेसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : घरभर प्लॅस्टिक बाटली फिरवा आणि पाहा जादुई परिणाम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement