1201746 रुपयांचं वॉच, सोन्याचा Iphone 17 अन्... संजय दत्तचा जबरा पाकिस्तानी फॅन! संजू बाबावर केली कोटींच्या गिफ्ट्सची बरसात
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sanjay Dutt got expensive gifts from a Fan: बॉलिवूडचा लाडका संजू बाबा जिथे जाईल, तिथे त्याच्याभोवती फॅन्सची गर्दी जमते. पण नुकतेच त्याला एक असा चाहता भेटला, ज्याला पाहून खुद्द संजू बाबा शॉक झाला आहे.
मुंबई: गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात धुरंधर सिनेमा रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले. जगभरात १३०० कोटींची कमाई करत हा सिनेमा २०२५ मधील ब्लॉकबस्टर ठरला. या फिल्ममधील प्रत्येक कलाकाराचे कौतुक झाले. मात्र संजय दत्तने आपल्या खास स्वॅगने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. बॉलिवूडचा लाडका संजू बाबा जिथे जाईल, तिथे त्याच्याभोवती फॅन्सची गर्दी जमते. पण नुकतेच त्याला एक असा चाहता भेटला, ज्याला पाहून खुद्द संजू बाबा शॉक झाला आहे. या पठ्ठ्याने संजय दत्तला असे महागडे गिफ्ट्स दिले आहेत, जे पाहून इंटरनेट हादरलं आहे.
दुबईमध्ये संजू बाबाला असा एक चाहता भेटला आहे, ज्याने त्याला दिलेल्या भेटवस्तू पाहून सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा प्रसिद्ध टिक-टॉकर काशिफ जमीर याने संजय दत्तवरील आपले प्रेम चक्क सोन्या-चांदीत तोलले असून, त्याने दिलेल्या गिफ्ट्सची किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील.
संजू बाबाला मिळाली कस्टमाइज IPhone 17 ची भेट
advertisement
नुकतेच संजय दत्त आणि काशिफ जमीर यांची दुबईमध्ये भेट झाली. यावेळी काशिफने संजू बाबाला एक गोल्ड प्लेटेड आयफोन १७ भेट म्हणून दिला. काशिफने खास संजय दत्तसाठी हा फोन कस्टमाइज करून घेतला होता. विशेष म्हणजे, फोनच्या मागच्या बाजूला संजय दत्तचे आई-वडील, दिग्गज अभिनेते सुनील दत्त आणि नर्गिस यांचा फोटो प्रिंट केलेला आहे. ही अनमोल भेट पाहून संजू बाबाही काही वेळासाठी जुन्या आठवणीत हरवून गेला होता. इतकेच नाही, तर या डायहार्ड फॅनने
advertisement
काशिफ जमीर आणि संजय दत्त यांची दुबईमध्ये नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान काशिफने संजू बाबाला एक गोल्ड-प्लेटेड आयफोन १७ (iPhone 17) भेट दिला. विशेष म्हणजे, हा फोन काशिफने खास कस्टमाइज करून घेतला आहे. संजय दत्तला 'स्पॅनिश वुल्फ लेदर'चे २१ कॅरेट सोन्याचा मुलामा असलेले लिमिटेड एडिशन घड्याळ भेट दिले. रिपोर्ट्सनुसार, या घड्याळाची किंमत जवळपास १२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. यावरच हा चाहता थांबला नाही, तर त्याने संजू बाबाची पत्नी मान्यता दत्त हिच्यासाठी सुद्धा हाताने तयार केलेला एक महागडा ज्वेलरी सेट भेट म्हणून दिला. या महागड्या भेटवस्तू पाहून संजय दत्त सुरुवातीला आश्चर्यचकित झाला, पण चाहत्याचे प्रेम पाहून त्याने ते आनंदाने स्वीकारले.
advertisement
advertisement
संजय दत्तबद्दल फॅन्सचे हे अफाट प्रेम पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१८ मध्ये एका महिला चाहत्याने तिच्या निधनापूर्वी चक्क तिची ७२ कोटी रुपयांची सर्व मालमत्ता संजय दत्तच्या नावे केली होती. मात्र, जेव्हा संजयला हे समजले, तेव्हा त्याने अत्यंत मोठेपणा दाखवत ती सर्व संपत्ती त्या चाहतीच्या वारसदारांना परत केली होती.
advertisement
धुरंधर २ मध्ये दिसणार एसपी चौधरीचा जलवा
संजय दत्त सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar: The Revenge) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यात संजय दत्त एसपी चौधरी असलम या एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या तुफान व्हायरल होत असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 3:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
1201746 रुपयांचं वॉच, सोन्याचा Iphone 17 अन्... संजय दत्तचा जबरा पाकिस्तानी फॅन! संजू बाबावर केली कोटींच्या गिफ्ट्सची बरसात








