छान छान मराठी! या अभिनेत्रीची भाषा ऐकून भारावली सोनाली कुलकर्णी, पुन्हा बोलण्याची डिमांड,VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका कार्यक्रमात तिला एक अभिनेत्री भेटली आणि तिच्या मराठीचं तिनं खूप कौतुक केलं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. नेहमीप्रमाणे सुंदर साडी आणि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू पाहायला मिळालं. याच कार्यक्रमात सोनाली एका अभिनेत्रीला भेटली. तिची भाषा ऐकून ती भारावून गेली. तू पुन्हा बोल हा! असं म्हणत तिला पुन्हा बोलण्याची विनंतीही केली. त्या अभिनेत्रीसोबतचा सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका कार्यक्रमात ज्या अभिनेत्रीला भेटली ती अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकुर. दोघींमधील खास क्षणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मृणाल आणि सोनाली समोरासमोर आल्या. यावेळी दोघींमध्ये हलक्या-फुलक्या गप्पा रंगल्या.
advertisement
कार्यक्रमात सोनाली कुलकर्णींनीही मृणालचं मनापासून कौतुक केलं. "मला तुला भेटून खूप छान वाटलं," असं ती म्हणाली. हे ऐकून मृणाल भारावून गेली. सोनालीचे शब्द ऐकताच तिने त्यांचा हात हातात घेतला आणि प्रेमाने किस करत आभार मानले.
यानंतर सोनाली म्हणाली, "कोण छान छान मराठी बोलतं आणि आम्हाला एंटरटेन करतं." सोनालींचं कौतुक ऐकून मृणाल हसली आणि म्हणाली, "अहिराणी…" त्यावर सोनील म्हणाली, "आत जाऊन बोल हा."
advertisement
advertisement
हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृणालचं मराठीबद्दलचं प्रेम आणि साधेपणा पाहून चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. तसचं एका अभिनेत्रीनं दुसऱ्या अभिनेत्रीचं इतक्या मनापासून कौतुक करणंही चाहत्यांना आवडलं.
अभिनेत्री मृणाल ठाकुर हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत यश मिळवत असतानाही मृणालचं मराठीशी असलेलं नातं कायम घट्ट असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. मृणाल तिच्या नव्या सिनेमांच्या प्रमोशनमध्ये बिझी होती. एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान ती अहिराणी बोलीत बोलताना दिसली आणि यामुळे चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं.
advertisement
एका महिला पत्रकाराने मृणालला अहिराणी बोलीत प्रश्न विचारला. "तुले सर्वांत जास्त काय आवडस? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी?" यावर मृणालने क्षणाचाही विलंब न लावता हसत उत्तर दिलं, "माले घोटेल वांगानी भाजी, वरण बट्टी आवडस. वरण बट्टी लायेल शे ना तू? मी वरण बट्टी, तूप आणि लिंबूशिवाय नाही होणार हा." मृणालचा अहिराणी बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 3:56 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
छान छान मराठी! या अभिनेत्रीची भाषा ऐकून भारावली सोनाली कुलकर्णी, पुन्हा बोलण्याची डिमांड,VIDEO








