बऱ्याच गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा लॉक आणि झाडूचा जुगाड. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. झाडूला लॉक लावण्याचा मोठा फायदा आहे. विशेषतः नव्या झाडूला. नवीन झाडू आणताच तुम्ही त्याला न विसरता लॉक लावा.
आता हे करायचं कस, याचा काय आणि कसा फायदा आहे ते आपण व्हिडीओत पाहूया. महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार झाडूला एक कॉटन बॅग घालायची आहे. झाडूचा जो खालचा झुपरेदार भाग असतो, ज्याने आपण कचरा काढतो. तो भाग या बॅगमध्ये संपूर्ण झाकला जाईल याची काळजी घ्या.
advertisement
Kitchen Jugaad : मेणबत्ती लावायची तर नळावर, मोठा फायदा, VIDEO मध्ये पाहा परिणाम
आता एक लॉक घ्या आणि हा लॉक कॉटन बॅग लावलेल्या झाडूवर लावा. झाडूला लावून हा लॉक त्यावर घासा, लॉकने झाडूवर हळुवारपणे मारा. थोड्या वेळाने अलगद झाडूवरील पिशवी काढा, तुम्ही आत पाहाल तर आत सर्व झाडुचा भुसा दिसेल. नवीन झाडू आणल्यानंतर त्यातून असा भुसा पडतो. बरेच दिवस कचरा काढताना असा भुसा वारंवार पडत राहतो. झाडूमुेळे अधिकच कचरा होतो. अशा वेळी हा उपाय फायद्याचा ठरेल.लॉकने झाडूवर मारल्यावर, लॉक झा़डूवर घासल्यावर झाडूचा भुसा निघून जाईल आणि तुमचा सर्वात मोठा त्रास संपेल.
SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.