कांदा सोलून घ्या, चिरून घ्या आणि तो किसून घ्या. आता वाटीत थोडं दूध घ्या. या दुधात किसलेल्या कांद्याचा रस गाळणीनं गाळून घ्या. दूध आणि कांद्याचा रस एकत्र करा. हे एक सोल्युशन तयार झालं. दोन चमचा दुधात अर्धा कांदा पुरेसा आहे. हे सोल्युशन बनवून ठेवू नका, जितकं लागेल तितकंच बनवून वापरा.
advertisement
Kitchen Jugaad Video : चहात थोडीशी टाल्कम पावडर टाका, होईल फायदा
आता याचा फायदा काय तर... हे सोल्युशन तुम्ही कापसाच्या बोळ्याने तुमच्या भुवयांवर लावा. तुमच्या भुवया पातळ असतील तर हे सोल्युशन लावल्यास तुमच्या भुवया दाट होतील, असा दावा या महिलेने केला आहे. तिनं हे मिश्रण रात्री झोपताना लावण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
सूचना : हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
Location :
Delhi
First Published :
June 06, 2025 2:01 PM IST