TRENDING:

Kitchen Jugaad Video : गॅसवर शॅम्पू टाकताच जणू जादूच झाली, गॅस लवकर संपणारच नाही

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : शॅम्पूचा वापर केस धुण्यासाठी होतो.  पण हाच शॅम्पू किचनमध्ये गॅससाठीही फायद्याचा ठरू शकतो याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : शॅम्पूचा आपण कशासाठी वापरतो, साहजिक केस धुण्यासाठी असं प्रत्येकाचं उत्तर असेल. पण तुम्हाला माहिती आहे तुमचे केस स्वच्छ करणारा हाच शॅम्पू तुमच्या गॅसचीही बचत करू शकतो, असं सांगितलं तर... साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल. शॅम्पू गॅसची बचत कसा करेल, याचा जबरदस्त किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

शॅम्पू असा अनोखा वापर ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. एका महिलेने गॅसवर शॅम्पू टाकून गॅसची बचत कशी करायची हे दाखवलं आहे.  हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडेल. महिलेने व्हिडीओच पोस्ट केला आहे. तिनं नेमकं काय केलं आहे ते पाहुयात.

Kitchen Jugaad Video : खेळण्यातल्या गोट्या किचनमध्ये मोठ्या कामाच्या, असा करा वापर

advertisement

महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार ती गॅसचे बर्नर काढते. त्यावर शॅम्पू टाकते आणि टूथब्रशच्या सहाय्याने शॅम्पू बर्नरवर घासून घेते. यानंतर ती शॅम्पू लावलेला हा बर्नर पाण्याने धुते. त्यावेळीसुद्धा ब्रशने घासते. त्यानंतर बर्नर एका कापडाने पुसून स्वच्छ, कोरडे करून घेते. त्यानंतर ती त्या बर्नरच्या छिद्रात सुई टाकते.

आता याचा फायदा काय, यामुळे गॅसची बचत कशी होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्ही पाहिलं असेल. गॅसच्या बर्नरला गंज लागतो. ज्यामुळे गॅस मंद पेटतोय, यासाठी बराच गॅस वाया जातो. पण गॅस बर्नर अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्या आणि आधी आणि नंतरचा फरक पाहा. बर्नर आधी ज्यापद्धतीने पेटत होता, तसा पेटत नाही. छिद्र मोकळी झाल्याने गॅस फार वाया जाणार नाही.

advertisement

Jugaad Video : केर काढण्यासाठीच नाही कपडे वाळवण्याच्या कामीही येते झाडू, अशी वापरा

Laxmi majagahe युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेने महिन्यातून एकदा-दोनदा अशा पद्धतीने बर्नर स्वच्छ करण्याचा सल्ला दिला आहे.

तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

advertisement

(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : गॅसवर शॅम्पू टाकताच जणू जादूच झाली, गॅस लवकर संपणारच नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल