Kitchen Jugaad Video : खेळण्यातल्या गोट्या किचनमध्ये मोठ्या कामाच्या, असा करा वापर

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : खेळण्यातल्या गोट्यांचा किचनमध्ये वापरता येतील याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? असा जबरदस्त जुगाड की तुम्हीही पाहिल्यानंतर लगेच कराल.

News18
News18
नवी दिल्ली : गोट्या किंवा मार्बल बॉल्सनी तुम्ही लहानपणी खेळलाच असाल. गोट्यांनी गोट्यांवर अचूक नेम लावला असाल. पण लहानपणी तुम्ही ज्या गोट्यांनी खेळलात किंवा आता तुमची मुलं ज्या गोट्यांनी खेळत आहेत, त्या गोट्या तुमच्या किचनमध्येही कामाला येऊ शकतात, याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? हा जबरदस्त असा किचन जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
लहाणपणी गोट्या खेळताना तुम्ही पालकांचा ओरडा खाल्ला असेल. किंवा आता तुम्ही तुमच्या मुलांना ओरडत असाल. पण याच गोट्या किचन मध्ये तुमचं मोठं काम हलकं करतील.
तुम्हाला करायचं काय आहे तर एक खोलगट ताट घ्या. त्यात गोट्या टाका. यावर एक दुसरं ताट ठेवा. आता हे ताट तुमच्या किचन कॅबिनेटमध्ये ठेवा. त्यावर केबिनेटमधील छोटे छोटे डब्बे ठेवा.
advertisement
आता तुम्ही पाहाल तर तुमचं विस्कळीत दिसणारं किचन कॅबिनेट एकदम व्यवस्थित दिसेल. शिवाय तुम्हाला हवा तो डब्बा सहज मिळेल. ताटावर ठेवलेलं ताट गोट्यांमुळे गरागरा फिरेल. तुम्हाला फक्त वरचं ताट हलवायचं आहे.
हा तुमचा घरगुती किचन कॅबिनेट स्पिनर तयार झाला.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Dippout (@dippoutmon)



advertisement
@dippoutmon इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : खेळण्यातल्या गोट्या किचनमध्ये मोठ्या कामाच्या, असा करा वापर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement