तांदळाच्या जुगाडचा हा व्हिडीओ महिलेने सांगितल्यानुसार तसं या जुगाडासाठी कोणताही तांदूळ वापरू शकता पण आपल्या कमीत कमी खर्चात जबरदस्त असा जुगाड करायचा आहे म्हणून आपण रेशनचा तांदूळ वापरला आहे.
एक कप किंवा 200 ग्रॅम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यातील पाणी निथळून घ्या. तांदूळ धुवायचा नसेल तर ओल्या कपड्याने पुसून घ्या. ओला तांदूळ तांदूळ चाळणीवर ठेवून चाळणी दुसऱ्या भांड्यावर ठेवा म्हणजे अतिरिक्त पाणी निघून जाईल. पाणी निथळलं की तांदूळ एका कापडावर पसरून पंख्याखाली ठेवा. ऊन असेल तर उन्हात सुकवा तांदूळ चांगले सुकले की गॅसवर कढईल अर्धा कप तेल गरम करून या तेलात थोडे थोडे तांदूळ लालसर होईपर्यंक किंवा ब्राऊन रंग येण्याआधी तळून घ्या. तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता.
advertisement
Kitchen Jugaad Video : सणासुदीला पुऱ्यांचा बेत, तेल नाही तर पाण्यातच कशा तळायच्या पाहा
तळलेले तांदूळ थंड करून मिक्सरमध्ये टाकून त्याची शक्य तितकी बारीक पावडर करून घ्या. पावडर बाजूला काढून ठेवा. आता या मिक्सरच्या भांड्यात काजू, 4 वेलची आणि डेसिकेटेड कोकोनट टाकून त्याचीही पावडर करून घ्या. डेसिकेटेड कोरोनट बारीकच असतो पण काजू, वेलची नीट बारीक होण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट यात घालायचं आहे.
आता गॅसवर पॅन ठेवा. एक कप तांदळासाठी दीड कप दूध या पॅनमध्ये घ्या. दुधाऐवजी पाणीही वापरू शकता, पण दुधाने चव चांगली येते. आता या दुधात पाऊण कप साखर गोड आवडत असल्यास एक कप तांदळासाठी एक कप साखर टाकायला हरकत नाही. साखर पूर्ण विरघळली की दुधात काजू, डेसिकेडेट कोकोनटची पावडर हळूहळू टाका आणि नीट ढवळा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. याऐवजी तुम्ही खवा किंवा मावाही टाकू शकता.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आहे. मिश्रण घट्ट होईपर्यंत परतायचं आहे. आता एक चमचा तूप घाला आणि मिश्रण मिक्स करून घ्या. यामुळे मिश्रणाला चमक आणि चवही येईल. आता या मिश्रणाचे 80 टक्के आणि 20 टक्के असे दोन भाग करा. 80 टक्के मिश्रण पॅनमधून काढून बाजूला ठेवा आणि 20 टक्के मिश्रणासाठी पाव वाटी दूध घ्या त्यात 2 चमचे कोको पावडर मिक्स करून ते या मिश्रणात मिक्स करा. मिश्रणाला चॉकलेटी रंग येईल. तुम्ही इथं वेगवेगळ्या फूड कलरचाही वापर करू शकता. ही स्टेप नाही केली तरी चालेल. तुम्ही आधीचं जे मिश्रण होतं तेच पूर्णही वापरू शकता. पण दोन कलरमध्ये केल्याने आकर्षकही दिसेल.
Kitchen Jugaad : नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनआधी कुकरमध्ये नारळ नक्की ठेवा, का? Watch Video
आता केक टिनला तूप लावून घ्या. केक टिन नसेल तर ताटाला तेल किंवा तूप लावून घ्या. त्यावर 80% मिश्रण जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते टिनमध्ये नीट पसरवून घ्या. आता यावर चॉकलेटी मिश्रण पसरवून घ्या. मिश्रण पसरवण्यासाठी स्पॅच्युलाची मदत घ्या. स्पॅच्युला नसेल तर वाटीच्या खाली तेल किंवा तूप लावून मिश्रण नीट पसरवा.
मिश्रण नीट थंड होऊ द्या. त्यानंतर टिन उलटा करून मिश्रण बाहेर काढा. वरून सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स कापून पसरवा. आता याचे छोटेछोटे काप करा. ही तुमची घरगुती मिठाई तयार झाली. अशी मिठाई बाजारात खूप महाग मिळते. पण घरी अगदी कमीत कमी खर्चात ही महागडी मिठाई तुम्ही बनवली आहे.