advertisement

Kitchen Jugaad : नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनआधी कुकरमध्ये नारळ नक्की ठेवा, का? Watch Video

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : कुकरमध्ये नारळ या जबरदस्त असा किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याचा जबरदस्त असा फायदा आहे. एकदा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हीसुद्धा हा उपाय लगेच कराल.

News18
News18
नवी दिल्ली :  9 ऑगस्ट रक्षाबंधन आणि त्याआधी 8 ऑगस्ट नारळीपौर्णिमा. यादिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. तसंच यादिवशी नारळापासून खास पदार्थ बनवता जातो तो म्हणजे नारळीभात. पण नारळीपौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याआधी नारळाचा एक उपाय जरूर करायला हवा तो म्हणजे कुकरमध्ये नारळ ठेवण्याचा.
कुकरमध्ये नारळ या जबरदस्त असा किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याचा जबरदस्त असा फायदा आहे. एकदा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हीसुद्धा हा उपाय लगेच कराल. नारळ घ्या, त्याच्या शेंड्या काढून टाका. आता प्रेशर कुकर घेऊन त्यात नारळ ठेवा 2 ग्लास पाणी टाका. कुकरचं झाकण बंद करून गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्या.
advertisement
कुकर थंड झाला की त्याचं झाकण उघडा. आतील नारळ गरम असतील तर ते थंड होऊ द्या. आता नारळावर ठोकता येईल अशी जड वस्तू घ्या. नारळावर सर्व बाजूने ठोका. थोड्या वेळाने तुम्हाला नारळाच्या वरचं कवच निघताना दिसेल आणि तुम्हाला अख्खा नारळ मिळेल. त्यावर  थोडंफार काळा भाग राहिला असेल तो सुरीने खरवडून काढता येईल.
advertisement
आता या नारळाला मध्यभागी सुरीने चीर देऊन त्यातील पाणी काढून घ्या. मग तो मध्यभागी कापून त्याचे दोन तुकडे करा. सुरीने त्याचे पातळ काप कापून घ्या आणि मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या. हा नारळ न खवता नारळाचा किस तयार झाला. नारळीपौर्णिमा म्हणजे नारळभात आणि नारळापासून वेगवेगळे पदार्थ बनवणं आलंच. यासाठी नारळाचा किस लागतो. असा झटपट तुम्ही नारळाचा किस बनवू शकता.
advertisement
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad : नारळीपौर्णिमा, रक्षाबंधनआधी कुकरमध्ये नारळ नक्की ठेवा, का? Watch Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement