Kitchen Jugaad Video : सणासुदीला पुऱ्यांचा बेत, तेल नाही तर पाण्यातच कशा तळायच्या पाहा

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : तेलकट म्हणून अनेक जण पुऱ्या खाणं टाळतात. काहींना असे आजार असतात की त्यांना जास्त तेलकट न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी ते पुऱ्या खाऊ शकत नाही. पण आता बिलकुल टेन्शन नाही कारण तेल न वापरता तुम्ही पाण्यातही पुरी तळू शकता.

News18
News18
मुंबई : श्रावण म्हणजे सणवार आणि सणवार म्हणजे गोडधोड आणि गोडधोड म्हटलं की श्रीखंडपुरीचा बेत हा होतोच. आता पुरी म्हटली की तेल आलंच. पुऱ्यांना तळण्यासाठी तेल फार लागतं. तळल्यावरही त्यावर तेल असतं. पण तुम्हाला तेलाशिवाय पुऱ्या तळता येतील, तेसुद्धा पाण्यात असं सांगितलं तर... विश्वास बसत नाही आहे ना? या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तेलकट म्हणून अनेक जण पुऱ्या खाणं टाळतात. काहींना असे आजार असतात की त्यांना जास्त तेलकट न खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी ते पुऱ्या खाऊ शकत नाही. पण आता बिलकुल टेन्शन नाही कारण तेल न वापरता तुम्ही पाण्यातही पुरी तळू शकता. तेलाचा वापर न करता पाण्यात पुऱ्या कशा बनवायच्या याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर आहेत. असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. एका शेफन तेलाशिवाय पुऱ्या कशा बनवायच्या हे दाखवलं आहे. चला तर मग थोडाही उशीर न करता आता या पाण्यात पुऱ्या बनवायच्या कशा ते पाहुयात.
advertisement
पुऱ्यांसाठी साहित्य
गव्हाचं पीठ
मीठ
ओवा
दही
पाणी
पाण्यातल्या पुऱ्यांची कृती
सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचं मीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ टाका. थोडासा ओवा टाका. आता त्यात एक चमचाभर दही टाका. आपण या पुऱ्यात एक थेंबही तेल वापरणार नाही. त्यामुळे पीठ मळताना तेलाऐवजी दह्याचा वापर करा. जेणेकरून पुऱ्या नरम होतील. पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि पुऱ्या लाटून घ्या.
advertisement
आता गॅसवर एका कढईत पाणी गरम करायला ठेवा. पाणी बुडबुडे येईपर्यंत उकळून घ्या. या उकळत्या पाण्यात पुरी टाका. जशा तेलात पुरी तळतो तशा पाण्यात तळून घ्या. दोन्ही बाजूने नीट शेकवून घ्या. पुऱ्या थोड्या प्रमाणात फुलतात आणि काही वेळाने पाण्यावर तरंगू लागतात. त्यावेळी या पुऱ्या बाहेर काढा. तुम्ही नीट पाहिलं तर पुऱ्यांचा रंग तेलात तळल्यावर बदलतो तसा बदलेला नाही. त्यामुळे या पुऱ्या तुम्ही आता खाऊ शकत नाही.
advertisement
आता तुम्हाला लागणार ते एअर फ्रायर. पाण्यात तळलेल्या या पुऱ्या एअर फ्रायमध्ये टाका. तुम्ही आता पाहाल तर पुऱ्या तेलात तळतो तशा फुलल्या आहेत. त्यावर तेल बिलकुल नाही. आता तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता.
अजय रेसिपीज या युट्यूब चॅनेलवर पाण्यात तळलेल्या या पुऱ्यांची रेसिपी दाखवण्यात आली आहे. ही रेसिपी परफेक्ट होईलच याची हमी न्यूज 18 मराठी देत नाही. पण तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा आणि कशी झाली ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : सणासुदीला पुऱ्यांचा बेत, तेल नाही तर पाण्यातच कशा तळायच्या पाहा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement