बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये दागिने ठेवण्याचा मोठा फायदा आहे. तो काय हे एका गृहिणीने एका व्हिडीओतून सांगितलं आहे. तिने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनेक गृहिणी काही ना काही घरगुती जुगाड करत असतात. दागिन्यांचा हा जुगाडही अशाच जुगाडांपैकी एक आहे. अशा जुगाडाचा तुम्ही कधी विचारही केला नसेल
गृहिणीने व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तिने वेगवेगळे ज्वेलरी बॉक्स घेतले आहेत. त्यात वेगवेगळे दागिने आहेत. ते सर्व दागिने तिने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये केले आहेत. अशाच पद्धतीने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये सर्व दागिने ठेवण्याचा सल्ला तिने दिला आहे. त्यानंतर हा बॉक्स एका कापडात गुंडाळा, असं तिनं सांगितलं आहे.
advertisement
Kitchen Jugaad - इस्त्रीची गरजच नाही, छोट्या छोट्या दगडांनी प्रेस करा कपडे; कसं ते पाहा Video
नंतर ही गृहिणी हा कापडात गुंडाळलेला ज्वेलरी बॉक्स टॉयलेटमध्ये घेऊन जाते. तिथं एक डस्टबिन आहे. जो स्वच्छ आणि पूर्ण रिकामा आहे. म्हणजे याआधी कचऱ्यासाठी हा डस्टबिन वापरलेला नाही. या डस्टबिनमध्ये ती हा बॉक्स ठेवते. त्यानंतर ती त्यावर साबणाचे रिकामे बॉक्स आणि रिकाम्या बाटल्या टाकते. जेणेकरून दागिन्यांचा बॉक्स पूर्णपणे झाकला जाईल.
गृहिणीने सांगितल्यानुसार जेव्हा तुम्ही कधी घराबाहेर जाणार असाल आणि घरात महागडे दागिने असतील जे चोरीला जाण्याची भीती वगैरे असेल तेव्हा तुम्ही हा जुगाड करू शकता. चोर टॉयलेटमध्ये जाऊन डस्टबिन उघडून तर बिलकुल पाहणार नाहीत. डस्टबिनमध्ये असं काही असेल याचा कुणी विचारही करणार नाही. जरी काही टाकण्यासाठी डस्टबिन उघडलं तरी त्यात वर टाकलेला कचराच दिसेल. ज्यात कुणी हात टाकणार नाही.
Kitchen Jugaad Video - दरवाजावर लावा पाण्याची पिशवी; ती समस्या घरात येणं दूर, दारातूनच पळून जाईल
इंडियन व्लॉगर पिंकी युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
