advertisement

Kitchen Jugaad - इस्त्रीची गरजच नाही, छोट्या छोट्या दगडांनी प्रेस करा कपडे; कसं ते पाहा Video

Last Updated:

दगडांचा उपयोग इस्री करण्यासाठी करता येऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? पण एका गृहिणीने ते करून दाखवलं आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : कपडे प्रेस करायचं म्हटलं की इस्री लागते आणि त्यासाठी लाइट लागते. पण बऱ्याचदा इस्री नसते, इस्त्री बिघडते किंवा लाईट जाते, तेव्हा कपडे प्रेस कसे करायचं असा प्रश्न पडतो. पण लाइट नसली आणि इस्री नसली तरी तुम्ही कपडे प्रेस करू शकता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही चक्क छोट्या छोट्या दगडांनीही कपडे प्रेस करू शकता. आता ते कसं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दगडांचा उपयोग इस्री करण्यासाठी करता येऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? पण एका गृहिणीने ते करून दाखवलं आहे. अनेक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा दगडांनी कपडे इस्त्री करण्याचा जबरदस्त असा किचन जुगाड. एकदा का तुम्ही पाहिला तर हाच उपाय कायम कराल.
advertisement
महिलेने व्हिडीओत  जे दगड दाखवले आहेत, तसे दगड तुम्हाला घ्यायचे आहेत. महिलेने सांगितल्यानुसार हे दगड एकदा गरम केले की ते बराच वेळ गरम राहतात. आता तुम्हाला एका भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे. हे पाणी प्रेशर कुकरमध्ये टाका आणि त्यात हे दगड टाका. आता  कुकरचं झाकण लावून घ्या. जे कपडे प्रेस करायचे आहेत, त्यावर इस्त्रीसारखा हा कुकर फिरवा.
advertisement
व्हिडीओत महिलेने हे करून दाखवलं आहे आणि त्याचा परिणामही आश्चर्यचकीत करणारा आहे. कपड्यांवरील सुरकुत्या काही वेळातच गायब झाल्याचं तुम्ही पाहाल.
Avika Rawat Foods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि खरंच या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा परिणाम दिसून आला का, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad - इस्त्रीची गरजच नाही, छोट्या छोट्या दगडांनी प्रेस करा कपडे; कसं ते पाहा Video
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement