TRENDING:

Kitchen Jugaad Video : एक रुपयाच्या नाण्याची कमाल; थांबली नळाची गळती

Last Updated:

नळाची गळती थांबवण्याचा जबरदस्त उपाय एका व्यक्तीने शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 08 सप्टेंबर :  बऱ्याचदा नळ पूर्णपणे बंद केला तरी त्यातून पाणी गळतं. थेंब थेंब पाणी पडत राहतं. यामुळे नाही म्हटलं तरी बरंच पाणी वाया जातं. नळाची गळती थांबवण्यासाठी, नळ दुरूस्त करण्यासाठी तुम्ही प्लंबर बोलवत असाल. यासाठी काही पैसा खर्च करत असाल. पण तुम्हाला माहिती आहे का? फक्त एक रुपयाचं नाणंही नळाची गळती थांबवू शकतं. एका व्यक्तीने या किचन जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

एक रुपयाचं नाणं. तसं आता एक रुपयात तसं फार काही येत नाही. पण हे एक रुपयाचं नाणं तुमच्या काही पैशांची बचत करू शकतं. नळ गळती ठिक करण्यात मदत करून हे नाणं प्लंबरचा खर्च वाचवू शकतं. आता एक रुपयाच्या नाण्याने नळगळती कशी काय थांबवायची ते पाहुयात.

फक्त एका नाण्याने थांबवा किचन सिंकची गळती; कशी ते पाहा Kitchen Jugaad Video

advertisement

व्हिडीओ तुम्ही पाहाल तर व्यक्तीने आधी मुख्य पाईपलाईन बंद केली आहे. त्यानंतर नळ उघडला आहे. या नळाच्या आत तोटीला एक रबर आहे, हा रबर नीट नसतो, त्यामुळे नळातून पाणी गळतं. आता हा रबरच तुम्हाला ठिक करायचा आहे. व्यक्तीने सांगितल्यानुसार हाच रबर तुम्ही उलटा करून घालू शकता किंवा फक्त एक रुपयात हा रबर मिळतो. हा नवा रबर तुम्ही या नळात बसवू शकता.

advertisement

व्यक्तीने व्हिडीओत दाखवल्यानुसार संपूर्ण प्रक्रिया करा आणि पाहा तुमच्या नळाची गळती थांबते की नाही. यासाठी तुमचा फक्त एक रुपयाच खर्च झाला. एक रुपयाच्या नाण्याने कमाल केली की नाही?

Kitchen Jugaad Video : घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये पैसे जरूर ठेवा; फायद्याचा उपाय

Tek makwana यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये द्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : एक रुपयाच्या नाण्याची कमाल; थांबली नळाची गळती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल