TRENDING:

भेंडीची भाजी कधी बर्फ टाकून बनवलीये का? पाहा हा Kitchen Jugaad Video

Last Updated:

उन्हाळा म्हटलं की बर्फाचा वापर जास्त वाढतो. बऱ्याच पेयांमध्ये बर्फ टाकला जातो. पण कधी कोणत्या भाजीत बर्फ टाकून पाहिला आहे का? विशेषतः भेंडीत बर्फ टाकून पाहा. एका गृहिणीने हा विचित्र पण जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भेंडी मसाला, भेंडी फ्राय, चटपटीत भेंडी... भेंडीपासून अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही बनवल्या असतील. पण कधी भेंडीत बर्फ टाकून पाहिला आहे का? म्हणजे बर्फ टाकून कधी भेंडीची भाजी तुम्ही बनवली आहे का? भेंडीमध्ये बर्फ टाकण्याचा मोठा फायदा आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
भेंडीत बर्फ टाकताच कमाल झाली (फोटो सौजन्य : युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
भेंडीत बर्फ टाकताच कमाल झाली (फोटो सौजन्य : युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement

भेंडी अनेक पोषणमूल्यांनी भरपूर असलेली भाजी आहे. भेंडीत प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिटामिन अ, ब, क, थायमेन आणि रिबोफ्लेव्हिनसारखे अनेक पोषक घटक असतात. तेव्हा सकाळी रिकाम्या पोटी भेंडीचे पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. अशी ही भरपूर पोषण मूल्य असलेली भेंडी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली असेल पण बर्फ टाकून नाही.

advertisement

Kitchen Jugaad : चपातीला नारळाची शेंडी लावताच झाली कमाल; काय ते Video मध्येच पाहा

उन्हाळा म्हटलं की बर्फाचा वापर जास्त वाढतो. बऱ्याच पेयांमध्ये बर्फ टाकला जातो. पण कधी कोणत्या भाजीत बर्फ टाकून पाहिला आहे का? विशेषतः भेंडीत बर्फ टाकून पाहा. एका गृहिणीने हा विचित्र पण जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. आता बर्फ टाकून भेंडीची भाजी कशी करायची, भेंडीमध्ये बर्फ टाकण्याचा काय फायदा आहे? हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

advertisement

नेमकं काय करायचं?

एका भांड्यात पाणी घ्या, त्यात भेंडी टाका. याच पाण्यात तुम्हाला बर्फाचे तुकडे टाकायचे आहे. याऐवजी तुम्ही भेंडी एका कापडात बांधून ती फ्रिजरमध्येही ठेवू शकता.

याचा फायदा काय?

भेंडी बाजारातून आणल्यानंतर काही वेळा ती आपण लगेच करत नाही. फ्रिजमध्ये किंवा बाहेर ठेवतो. त्यामुळे ती थोडी नरम पडते. तिच्यात जीवच नाही असं वाटतं. अशा भेंडीची भाजी केल्यासही तिची हवी तशी चव लागत नाही. पण जर का तुम्ही भेंडीत बर्फ टाकला आणि त्या पाण्यातून तुम्ही भेंडी बाहेर काढलात तर फरक तुम्हाला दिसून येईल. भेंडी अगदी ताजी वाटेल.

advertisement

Kitchen Jugad : मोबाइल कव्हरवर लावा टूथपेस्ट, अशी जादू होईल की तूम्ही पाहातच राहाल

Didi ye kaise karu या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
भेंडीची भाजी कधी बर्फ टाकून बनवलीये का? पाहा हा Kitchen Jugaad Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल