Kitchen Jugad : मोबाइल कव्हरवर लावा टूथपेस्ट, अशी जादू होईल की तूम्ही पाहातच राहाल
- Published by:Devika Shinde
- trending desk
Last Updated:
टूथपेस्ट फक्त दातांसाठीच नाही, तर डाग दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. तुम्हाला कपड्यांवरचे डाग काढायचे असतील किंवा कारच्या हेडलाइट्सची नीट साफसफाई करायची असेल, तर या सर्व कामांसाठी टूथपेस्ट वापरता येते.
मुंबई : आपण मोबाइल फोन वापरतो, फोनला बऱ्याचदा अस्वच्छ हातांनी स्पर्श करतो, त्यामुळे फोनचं बॅक कव्हर खराब होतं. नवीनच कव्हर अगदी दोन-तीन आठवड्यात घाण झालं की वाईट वाटतं. त्यामुळे ते स्वच्छ कसं करायचं याची माहिती घेऊ या. फोनचं बॅक कव्हर साफ करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही, फक्त दात घासण्याची टूथपेस्ट वापरल्याने ते साफ होईल.
टूथपेस्ट फक्त दातांसाठीच नाही, तर डाग दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. तुम्हाला कपड्यांवरचे डाग काढायचे असतील किंवा कारच्या हेडलाइट्सची नीट साफसफाई करायची असेल, तर या सर्व कामांसाठी टूथपेस्ट वापरता येते. मोबाइल कव्हरवर टूथपेस्ट लावल्यास काय होतं, ते जाणून घेऊ या.
मोबाइल कव्हरवर टूथपेस्ट लावल्याने काय होतं?
दात स्वच्छ करण्याव्यतिरिक्त टूथपेस्ट इतर अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठीही कामी येते. मोबाइल कव्हरवर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर ते घालवण्यासाठी टूथपेस्ट उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या मोबाइलचे बॅक कव्हर काढावं लागेल. यानंतर कव्हरवर टूथपेस्ट नीट लावा, मग टूथब्रशच्या मदतीने ती पेस्ट कव्हरवर हलकी चोळा आणि नंतर कव्हर स्वच्छ पाण्याने धुवा. असं केल्यावर तुमच्या मोबाइल कव्हरवर लागलेले हळद, घाम किंवा कोणत्याही प्रकारचे डाग निघून जातील. फक्त ते खूप जास्त घासू नका, असं केल्याने बॅक कव्हरचा रंग बदलू शकतो, डिझाइन खराब होऊ शकतं. तसंच कव्हरवर स्क्रॅचेस दिसतील. त्यामुळे थोडं जपून कव्हर साफ करा.
advertisement
कशामुळे घाण होतात फोनची कव्हर्स
अनेक कारणांमुळे फोनचं कव्हर घाण होतं. किचनमध्ये काम करत असताना बरेच जण फोन वापरतात. हात स्वच्छ नसतील तर फोन घाण होतो. हातावरच्या हळदीचे डाग फोनच्या कव्हरवर पडतात. इतकंच नाही तर काही जण पांढऱ्या किंवा लाइट कलरचं मोबाइल कव्हर वापरतात. ती आकर्षक दिसतात; पण ते घाण होण्याची शक्यता जास्त असते. नवीन घेतल्यावर एक-दोन आठवड्यांत फोनचं कव्हर खराब होऊ लागतं. घाण होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हाताला येणारा घाम. घामेजलेल्या हाताने मोबाइलला स्पर्श केल्यावर फोन अस्वच्छ होतो व कव्हरवर डाग पडतात. त्यामुळे फोनला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 01, 2024 9:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Jugad : मोबाइल कव्हरवर लावा टूथपेस्ट, अशी जादू होईल की तूम्ही पाहातच राहाल