TRENDING:

Kitchen Jugaad Video : खेळण्यातल्या गोट्या किचनमध्ये मोठ्या कामाच्या; असा करा वापर, पैशांचीही होईल बचत

Last Updated:

खेळण्यातल्या गोट्यांचा किचनमध्येही असा वापर पाहून तुम्ही थक्क व्हाल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : गोट्या किंवा मार्बल बॉल्सनी तुम्ही लहानपणी खेळलाच असाल. गोट्यांनी गोट्यांवर अचूक नेम लावला असाल. पण लहानपणी तुम्ही ज्या गोट्यांनी खेळलात किंवा आता तुमची मुलं ज्या गोट्यांनी खेळत आहेत, त्या गोट्या तुमच्या किचनमध्येही कामाला येऊ शकतात, याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? हा जबरदस्त असा किचन जुगाड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
किचन जुगाड
किचन जुगाड
advertisement

लहाणपणी गोट्या खेळताना तुम्ही पालकांचा ओरडा खाल्ला असेल. किंवा आता तुम्ही तुमच्या मुलांना ओरडत असाल. पण याच गोट्या किचन मध्ये तुमचं मोठं काम हलकं करतील.

Kitchen Jugaad Video - बंद घड्याळही मोठं कामाचं; तुम्हाला माहिती नसेल त्याचा असा वापर

तुम्हाला करायचं काय आहे तर एक खोलगट ताट घ्या. त्यात गोट्या टाका. यावर एक दुसरं ताट ठेवा. आता हे ताट तुमच्या किचन कॅबिनेटमध्ये ठेवा. त्यावर केबिनेटमधील छोटे छोटे डब्बे ठेवा.

advertisement

आता तुम्ही पाहाल तर तुमचं विस्कळीत दिसणारं किचन कॅबिनेट एकदम व्यवस्थित दिसेल. शिवाय तुम्हाला हवा तो डब्बा सहज मिळेल. ताटावर ठेवलेलं ताट गोट्यांमुळे गरागरा फिरेल. तुम्हाला फक्त वरचं ताट हलवायचं आहे.

हा तुमचा घरगुती किचन कॅबिनेट स्पिनर तयार झाला.

टूथपेस्टच्या रिकामी ट्युबचे एक ना दोन तब्बल 6 फायदे; फेकण्याआधी हा जबरदस्त Kitchen Jugaad Video एकदा पाहाच

advertisement

@dippoutmon इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : खेळण्यातल्या गोट्या किचनमध्ये मोठ्या कामाच्या; असा करा वापर, पैशांचीही होईल बचत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल