तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. गॅसवर टॉयलेट क्लिनर टाकून तुम्ही गॅसची बचत करू शकता.
advertisement
Kitchen Jugaad Video - फक्त एका कपड्यानं केलं मॅजिक; सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शनच नाही
आता तुम्हाला काय करायचं ते पाहूयात. एका भांड्यात बर्फाचे तुकडे घ्या. त्यात हार्पिकसारखं टॉयलेट क्लीनर टाका. यात गरम पाणी टाका. बर्फ, टॉयलेट क्लिनर, गरम पाणी असलेल्या भांड्यात गॅसवरील बर्नर टाका. थोड्या वेळाने हे बर्नर बाहेर काढून त्याला जुन्या टूथब्रशने नीट घासून घ्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
नेम्ही पाहिलं असेल बर्याचदा बर्नर नीट पेटत नाही. बर्नरची छिद्रे ब्लॉक झालेली असतात. त्यामुळे बर्नरच्या बाजूने गॅस बाहेर पडतो. सिलेंडरमधून गॅस निघूनही बर्नर मधून तो वाया जातो. त्यामुळे गॅस लवकर संपतो.
पण हा उपाय केल्याने बर्नर वरील छिद्र मोकळी होतील आणि गॅस छिद्रातूनच बाहेर पडेल. यामुळे गॅसचीही बचत होईल गॅस लवकर संपणार नाही, असा दावा या गृहिणीने केला आहे.
Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावा; विचित्र आहे पण फायदाही मोठा
vlogs with meetpreet युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
