advertisement

Kitchen Jugaad Video - फक्त एका कपड्यानं केलं मॅजिक; सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शनच नाही

Last Updated:

अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक.

किचन जुगाड )फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड )फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 24 जून : सकाळी घाईघाईत टिफिन करताना किंवा दुपारी स्वयंपाक करताना अचानक सिलेंडर संपले की वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. पण आता गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही. सिलेंडरवर ओला कपडा ठेवल्यास कमाल होईल. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. एक ओला कापड सिलेंडरवर लावताच मोठी कमाल झाली. यामुळे सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शन नाही.
advertisement
आता तुम्हाला करायचं काय आहे तर एक कपडा घेऊन तो ओला करायचा आहे. या ओल्या कपड्याने संपूर्ण सिलेंडर पुसून घ्यायचा आहे. व्हिडिओ मध्ये गृहिणीने सांगितल्यानुसार जिथपर्यंत सिलेंडरमधील गॅस संपला तिथपर्यंत सिलेंडरवरील पाणी लगेच सुकेल. म्हणजे सिलेंडरचा तो भाग कोरडा होईल. तर जिथपर्यंत गॅस आहे तो भाग ओला राहील. यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते समजेल.
advertisement
Rk's kitchen Marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - फक्त एका कपड्यानं केलं मॅजिक; सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शनच नाही
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement