घरात कितीही स्वच्छता ठेवा, काहीही करा, उंदीर होतातच. उंदरांना मारण्यासाठी त्यांना घराबाहेर काढण्यासाठी तुम्ही काय काय उपाय करत नसाल. तरी उंदरांचा त्रास काही कमी होत नाही. आता सोशल मीडियावर बाटलीच्या झाकणाने उंदरांना न मारता घराबाहेर काढण्याच्या उपाय दाखवण्यात आला आहे. यामध्ये 2 मिनिटांत उंदीर स्वतःत पळतील असा दावा करण्यात आला आहे.
advertisement
साबण वापरण्याआधी त्यावर खिळा जरूर मारा; का ते पाहा Jugaad Video
आता करायचं काय?
तुम्हाला पीठ घ्यायचं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बेसनही वापरू शकता. बेसन शक्यतो खराब झालेलं वापरा जेणेकरून ते वाया जाणार नाही. या पिठात एक्सपायर झालेलं औषध, लाल मसाला, लाल मसाला नसेल तर हिरवी मिरची वापरू शकता. आता सगळं मिक्स करा. थोडं पाणी टाकून मिश्रण नीट मळून घ्या. पाणी थोडं थोडं टाका. पीठ एकदम घट्ट आणि एकदम मुलायमही नसावं.
इथं पाहा व्हिडीओ
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
बाटल्यांच्या झाकणाचं काय करायचं?
आता तुम्ही म्हणाल इथं बाटल्यांचा झाकणाचा उल्लेख कुठे केला आहे. तर आता या स्टेपला तुम्हाला वापराचं आहे बाटलीचं झाकण. तुम्ही तयार केलेलं पीठ किंवा मिश्रण या झाकणात भरायचं आहे. उंदीर प्लॅस्टिककडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळे प्लॅस्टिकच्या झाकणातच हे मिश्रण भरा. जिथून उंदीर येतात, जिथं तुम्हाला दररोज उंदीर दिसतात अशा ठिकाणी ही मिश्रण भरलेली झाकणं ठेवा.
Jugaad Video : नेलकटरचा वापर करून असे शिवा कपडे, शिलाई मशीनची गरज पडणार नाही
या औषधाने उंदीर मरणार नाहीत. पण त्यांच्या शरीरात असं काही होईल की घरातून बाहेर पळून जातील. त्यांना हवेची गरज भासेल, असं या महिलेनं सांगितलं आहे.