TRENDING:

Kitchen Jugaad Video : किचनमधील हळदीची टॉयलेटमध्ये कमाल; परिणाम पाहून नेहमी कराल हा उपाय

Last Updated:

एका गृहिणीने टॉयलेटमध्ये हळदीचा अनोखा वापर दाखवला आहे. हा उपाय तुम्ही एकदा पाहिलात नेहमी कराल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 07ऑगस्ट : हळदीचा वापर आपण स्वंयपाकात करतो. याशिवाय औषध म्हणून  आणि सौंदर्यप्रसाधनांमध्येही हळद वापरली जाते. पण हळदीचा आणखी एक अनोखा असा वापर आहे. किचनमध्ये असणारी ही हळद टॉयलेटमध्येही खूप कामाची आहे. किचनमधील हळदीचा टॉयलेटमध्ये कमालीचा वापर आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

हळदीचा टॉयलेटमध्ये वापर करण्याचा मोठा फायदा आहे. याचा परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. एकदा परिणाम पाहिला की तुम्हीही हळद नेहमी टॉयलेटमध्ये वापराल. आता नेमका हळदीचा टॉयलेटमध्ये का आणि कसा वापर करायचा ते पाहुयात.

व्हिडीओत पाहू शकता गृहिणीने एका भांड्यात हळद घेतली आहे. त्यात तिने लसणीच्या पाकळ्या किसून टाकल्या आहेत. यात पाणी मिक्स केलं. एक प्रकारचं सोल्युशन तिनं तयार केलं, ते तिने बाटलीत भरलं. हे मिश्रण तिने टॉयलेटमध्ये ओतलं आहे. त्यानंतर ब्रशने टॉयलेट घासलं आहे आणि चांगलं पाणी ओतून टॉयलेट स्वच्छ करून घेतलं आहे. यानंतर टॉयलेटच्या तळाशी राहिलेलं हळदीचं पाणी फ्लश करून घ्या.

advertisement

Kitchen Jugaad Video : रात्री झोपण्याआधी न विसरता गॅसवर ठेवा कांदे; कुटुंबावरील मोठा धोका टळेल

हळद आणि लसणीचं हे मिश्रण टॉयलेट क्लिनरसारखं काम करतं. यामुळे टॉयलेट स्वच्छ होतं, टॉयलेटमधील बॅक्टेरियांचा नाश होतो, शिवाय टॉयलेटमधून दुर्गंधीही येत नाही, असा दावा या महिलेने केला आहे. कधी तुमच्याकडे टॉयलेट क्लिनर नसेल तर तुम्ही असं घरगुती टॉयलेट क्लिनर वापरू शकता. किंबहुना तुम्ही हेच टॉयलेट क्लिनर वापरलं तर तुमचे पैसेही वाचतील. याचा परिणाम पाहून तुम्हीही चकीत झाला असेल. टॉयलेट अगदी स्वच्छ झाल्याचं या व्हिडीओत दिसतं आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video - टूथपेस्टमध्ये टॉयलेट क्लिनर मिक्स करून वापरा; आहे जबरदस्त फायदा

Avika Rawat Foods  युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रेंडिंग चॉकलेट बाउल, 70 रुपयांपासून चाखा चवं,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : किचनमधील हळदीची टॉयलेटमध्ये कमाल; परिणाम पाहून नेहमी कराल हा उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल