advertisement

Kitchen Jugaad Video - टूथपेस्टमध्ये टॉयलेट क्लिनर मिक्स करून वापरा; आहे जबरदस्त फायदा

Last Updated:

टूथपेस्ट आणि टॉयलेट क्लिनरच्या एकत्रित वापराचा व्हिडीओ एका गृहिणीने शेअर केला आहे.

टूथपेस्ट - टॉयलेट क्लिनरची कमाल (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
टूथपेस्ट - टॉयलेट क्लिनरची कमाल (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
मुंबई, 03 ऑगस्ट : सकाळी उठल्यानंतर आपण सर्वजण दात घासतो. टूथब्रशवर टूथपेस्ट लावून आपण दात स्वच्छ करतो. पण तुम्ही कधी टूथपेस्ट आणि टॉयलेट क्लिनर एकत्र वापरून पाहिलं आहे का? टूथपेस्ट आणि टॉयलेट क्लिनर एकत्र वापरण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो व्हायरल होतो आहे.
गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी अशा जुगाडाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा व्हिडीओ. ज्यात तिने हा विचित्र पण फायदेशीर असा उपाय सांगितला आहे. टूथब्रशवर टूथपेस्ट लावल्यानंतर त्यावर टॉयलेट क्लिनरही नक्की टाका, असा सल्ला या महिलेने दिला आहे. आता याचा काय फायदा आहे ते व्हिडीओत पाहूयात.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला एका ब्रशवर टूथपेस्ट घेते आणि त्यावर हार्पिक टॉयलेट क्लिनकर टाकते. आता याने तुम्हाला दात घासायचे आहेत का? तर बिलकुल नाही. याचा उपयोग तुम्हाला अस्वच्छ वस्तू स्वच्छ करण्यासाठी करायचा आहे.
व्हिडीओत महिलेने खराब झालेला पाण्याचा मग आणि कंगव्यावर हे मिश्रण लावलं आहे. या ब्रथने तिने पाण्याचा मग आणि कंगवा घासला आहे. या वस्तूंना हे मिश्रण लावून तिने थोडा वेळ तशाच ठेवल्या, त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुतल्य. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही वस्तू अतिशय स्वच्छ झाल्या आहेत. त्यासुद्धा फार मेहनत न घेता. अशा इतर वस्तूही तुम्ही स्वच्छ करू शकता. अगदी टाइल्सही यामुळे चकाचक होतील.
advertisement
युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - टूथपेस्टमध्ये टॉयलेट क्लिनर मिक्स करून वापरा; आहे जबरदस्त फायदा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement