advertisement

Kitchen Jugaad Video : वॉशिंग मशीनची गरजच पडणार नाही; एका डब्यात असे धुवा कपडे

Last Updated:

कपडे धुण्याच्या सर्वात हटके पद्धतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब
फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : गृहिणींसाठी घरातील सर्व कामांपैकी एक कटकटीचं काम म्हणजे कपडे धुणं. तसं आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. पण तरी त्यासाठी पाणी आणि वीजही जास्त लागते. शिवाय आता पावसाळ्यात कपडे सुकणं मुश्किल. पण आता कपडे धुण्याचा जबरदस्त अशा किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
वॉशिंग मशीन, बादलीत तुम्ही कपडे धुतले असतील. पण कधी तुम्ही एका डब्यात कपडे धुवून पाहिले आहेत का? आता डब्यात कपडे कसे धुवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेने एक प्लॅस्टिक डबा घेतला आहे. त्याला छिद्रं पाडली आहेत. आता तिने या डब्याला दोरी बांधून तो एका ठिकाणी लटकवला आहे. त्यानंतर तिने बादलीतील ओले कपडे घेतले आणि ते या डब्यात टाकले. त्यानंतर तिने डब्याला बांधलेल्या दोरीला पिळ पडेल असा डबा गोलगोल फिरवला. त्यानंतर तिने तो सोडला.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर जसा तिने डबा सोडला तसा दोरीला लागलेला पिळ आपोआप सुटू लागला आणि डबा गरागरा फिरू लागला. जसा डबा गोल फिरू लागला तसं त्यातील छिद्रातून पाणी येऊ लागलं. हे पाणी डब्यातील कपड्यांचं पाणी आहे. ज्याप्रमाणे वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले जातात, तसेच कपडे या डब्यात धुतले जात आहेत. शेवटी तुम्ही पाहाल हळूहळू डब्यातून पाणी येणं बंद होईल, याचा अर्थ कपड्यांमध्ये पाणी राहिलं नाही. महिला ते कपडे काढून पिळून दाखवते, त्यात बिलकुल पाणी नाही आहे.
advertisement
अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे कपडे वॉशिंग मशीनशिवाय वॉशिंग मशीनसारखेच धुवू शकता. कपड्यातील सर्व पाणी निघाल्याने ते लवकर सुकतील. सोबत तुमच्या विजेचीही बचत होईल, असं या महिलेने सांगितलं आहे.
Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : वॉशिंग मशीनची गरजच पडणार नाही; एका डब्यात असे धुवा कपडे
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement