Gond Katira Use : गोंद कातीरा वापरताना तुम्ही 'ही' चूक करत नाही ना? पाहा योग्य पद्धत, मिळतील जास्त फायदे!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
गोंद कातीरामुळे आपलं शरीर हायड्रेटेड आणि थंड राहतं. मात्र यासाठी तुम्हाला गोंद कातीराचा योग्य पद्धतीनं वापर करता यायला हवा.
मुंबई : उन्हाळ्यात बरेच लोक आपल्या पेयांमध्ये गोंद कातीराचा वापर करतात. हे उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर असतं. यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड आणि थंड राहतं. मात्र यासाठी तुम्हाला गोंद कातीराचा योग्य पद्धतीनं वापर करता यायला हवा. गोंद कातीरा किती प्रमाणात वापरावा, कसा वापरावा याबद्दल इंस्टाग्रामवर somewhatchef या अकाऊंटवरून माहिती दिली गेली आहे.
गोंद कातीराचा योग्य वापर कसा करावा?
- सर्वात आधी तर गोंद कातीरा भिजण्याची पद्धत आणि वेळ महत्त्वाची आहे. 1 ग्रॅम गोंद कातीरा म्हणजेच 1 लहान तुकडा 200 मिली पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. तुम्ही याचा वापर कूलर ड्रिंक्स, लिंबू सरबत किंवा थंड दूध/मिठाईवर टॉपिंग म्हणून करू शकता.
- गोंद कातीरा शरीराला उन्हाळ्यात तुमच्या थंडावा देते. हे शरीरातील आम्लपित्त कमी करते आणि उष्णतेत शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण गोंद कातीरावापरताना तुम्ही काही चुका टाळायला हव्या.
advertisement
- गोंद कातीरा चुकूनही कोरडा खाऊ नका. भिजवल्यावर तो 10 पट फुगतो. भिजवलेला गोंद कतिरा फ्रिजमध्ये 2 दिवस ठेवता येतो. सोयीसाठी एकाच वेळी जास्त प्रमाणात भिजवून ठेऊ शकता.
गोंद कातीरा कोणासाठी फायदेशीर..
ज्या लोकांना आम्लपित्त, निर्जलीकरण किंवा शरीरातील उष्णता यांसारख्या उष्णतेशी संबंधित समस्या असेल असे लोक गोंद कातीरा घेऊ शकतात. मात्र हे लहान मुलांना देताना काळजी घ्यावी. विशेषतः 5 वर्षांवरील मुलांना हे खूप कमी प्रमाणात द्यावं.
advertisement
गोंद कातीरा कोणी खाऊ नये?
ज्या लोकांना कमी रक्तदाब, वारंवार सर्दी होणे, सायनसचा त्रास किंवा ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी गोंद कातीरा खाऊ नका. प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या 40 दिवसांच्या रिकव्हरीच्या काळात महिलांनी हे घेऊ नये. ज्यांना मूत्रपिंडाचे विकार असतील, जे रक्त पातळ करणारी किंवा लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधं घेत असतील त्यांनी गोंद कातीरा खाणं टाळावं.
advertisement
advertisement
प्रत्येक व्यक्तीने एका दिवसात केवळ 1 ग्रॅमच गोंद कातीरा घ्यावा. कारण ते त्याच्या मूळ आकाराच्या 10 पट फुगते. हे थोड्याशा प्रमाणातही शरीराला खूप थंडावा आणि पोषण देते. याचा कधीही प्रमाणापेक्षा जास्त करू नका. कारण त्यामुळे पोट फुगणे किंवा जुलाब असे त्रास होऊ शकतात. हिवाळ्यात किंवा थंड हवामानात याचा वापर करू नका. कारण त्यामध्ये तीव्र थंडावा देणारे गुणधर्म असतात.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 03, 2026 12:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gond Katira Use : गोंद कातीरा वापरताना तुम्ही 'ही' चूक करत नाही ना? पाहा योग्य पद्धत, मिळतील जास्त फायदे!










