TRENDING:

Kitchen Jugaad Video : सेफ्टी पिनचा वापर करून झटपट घासा सर्व भांडी

Last Updated:

सेफ्टी पिनचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : सामान्यपणे सेफ्टी पिन आपण साडीला लावण्यासाठी वापरतो. पण काटेपिनचे आणखीही काही वापर आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काटेपिन वापरून तुम्हालाही भांडीही घासता येतील. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. अगदी भांडी घासण्यासाठीही काही गृहिणी जबरदस्त अशी ट्रिक वापरतात.

भांडी घासायची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. पण तुम्ही कधी सेफ्टी पिनचा वापर करून भांडी घासून पाहिलीत का?

Kitchen Jugaad Video - वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसोबत हे 2 बॉल जरूर टाका; काय होतो फायदा ते पाहा

तुम्हाला करायचं काय आहे तर एक जुना मोठा ओढणीसारखा कपडा किंवा ओढणी घ्यायची आहे. त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार फोल्ड करायचं आहे. एक बाजू त्रिकोणी दुमडून त्यावर सेफ्टी पिन लावा. त्यात एक दोरी टाका आणि तीसुद्धा सेफ्टी पिनने लॉक करून घ्या. कपड्याच्या मधल्या भागाजवळ दोन्ही बाजूंनी सेफ्टी पिनने दोरी लावून घ्या.

advertisement

त्रिकोणी भागाकडील दोरी तुमच्या गळ्यात अडकवा तर मधल्या भागाकडील दोरी कमरेला बांधा. हा तुमचा अॅप्रन तयार झाला.

भांडी घासताना कपडे ओले, खराब होतात. त्यावेळी हा अॅप्रन वापरून तुम्ही झटपट भांडी घासू शकता. तुमचे कपडे खराब, ओले होण्याचं टेन्शन राहणार नाही.

आता तुम्ही म्हणाल की बाजारात असे अॅप्रन मिळतात. पण घरीच तयार केलेला हा अॅप्रन वापरून तुम्ही पैशांची बचत करू शकता.

advertisement

Kitchen Jugaad Video : गॅसवर टॉयलेट क्लिनर टाकताच झाली 'जादू'; गॅस लवकर संपणारच नाही

पुणेरी तडका युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं महाराष्ट्राचं मन जिंकलं! ‘मयुरी’चं डोहाळे जेवण असं केलं, की सगळीकडे..
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : सेफ्टी पिनचा वापर करून झटपट घासा सर्व भांडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल