advertisement

Kitchen Jugaad Video - वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसोबत हे 2 बॉल जरूर टाका; काय होतो फायदा ते पाहा

Last Updated:

तुम्ही म्हणाल वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी बॉलचा काय फायदा. तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.

किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : हल्ली अनेकांच्या घरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी आपण पाणी आणि डिटर्जंट टाकतो. पण यासोबत आणखी एक वस्तू यात टाकायला हवी ती म्हणजे बॉल. आता तुम्ही म्हणाल वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी बॉलचा काय फायदा. तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
प्रत्येकाची कपडे धुण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही महिला कपडे धुण्यासाठीही काही ना काही जुगाड वापरतात. अशाच एका महिलेने केलेला हा जुगाड. तिने इतरां साठी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
आता तुम्हाला करायचं काय आहे ते पाहूयात. वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला कपडे धुण्यासाठी लागेल तितकं पाणी घ्या. त्यात डिटर्जंट टाका. यानंतर महिलेने यात गुलाबी रंगाचा शाम्पू टाकला आहे. तिने शाम्पू ईझीच्या ऐवजी वापरल्याचं सांगितलं आहे. सोबत तिने फाॅइल पेपरचे दोन बॉल तयार करून तेसुद्धा टाकले आहेत.
advertisement
आता फाॅइल पेपरचा वॉशिंग मशीन मध्ये फायदा काय? तर यामुळे कपडे स्वच्छ आणि चमकदार होतात, असं या महिलेने सांगितलं आहे.
sangeeta tyagi vlogs युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांसोबत हे 2 बॉल जरूर टाका; काय होतो फायदा ते पाहा
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement