तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. एक ओला कापड सिलेंडरवर लावताच मोठी कमाल झाली. यामुळे सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शन नाही.
advertisement
अचानक गॅस सिलेंडर संपला तर...; चपाती बनवण्याचा जबरदस्त Jugaad Video Viral
आता तुम्हाला करायचं काय आहे तर एक कपडा घेऊन तो ओला करायचा आहे. या ओल्या कपड्याने संपूर्ण सिलेंडर पुसून घ्यायचा आहे. व्हिडिओ मध्ये गृहिणीने सांगितल्यानुसार जिथपर्यंत सिलेंडरमधील गॅस संपला तिथपर्यंत सिलेंडरवरील पाणी लगेच सुकेल. म्हणजे सिलेंडरचा तो भाग कोरडा होईल. तर जिथपर्यंत गॅस आहे तो भाग ओला राहील. यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते समजेल.
Kitchen Tips : गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? तर करा हे 5 सोपे उपाय, गॅसही वाचेल
Rk's kitchen Marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
